+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव. adjust*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा* *डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ adjustजनतेकडून सहलीची रजा मंजूर करून घेणारा आगळावेगळा मंत्री हसन मुश्रीफ adjustशाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन adjustछत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा काढला हा अपमान नाही काय? : राजेश क्षीरसागर adjustशाहू महाराजांना विजयी करून कोल्हापूरचे समतावादी विचार सिद्ध करा adjustशेतकऱ्यांचे प्रश्न दिल्लीत मांडण्यासाठी शाहू महाराजच खासदार आवश्यक : आ. पी. एन. पाटील adjustसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती adjustसंजय मंडलिक विधानसभेला मुश्रीफ की समरजितराजे सोबत राहणार ?
schedule27 Jul 23 person by visibility 178 categoryक्रीडा
कोल्हापूर /प्रतिनिधी: कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब चे वतीने रविवारी 10 सप्टेंबर 2023 रोजी ट्रायथलॉन आणि ड्यअथलॉन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा कोल्हापुरात होणार आहेत. ही स्पर्धा रविवारी सकाळी 6 वाजता सुरू होणार असून दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या स्पर्धेमध्ये पोहणे, सायकलिंग आणि धावणे अशा स्वरूपात ही स्पर्धा असणार आहे. ही स्पर्धा राजाराम तलाव येथे असणार आहे.


हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथॉलॉन मध्ये राजाराम तलाव येथे 2 किलोमीटर पोहणे, राजाराम तलाव ते तवंदी घाट 90 किलोमीटर सायकलिंग आणि शिवाजी विद्यापीठ रोडवर 21 किलोमीटर धावणे अशी स्पर्धा होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
 स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून 500 स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज आहे. नोंदणी 5 ऑगस्टपर्यंत www.kolhapursportsclub.com या संकेत स्थळावर करायची असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास कीट, एनर्जी ड्रिंक पाणी व रिफ्रेशमेंटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथॉलॉन प्रकारातील एक महिला व पुरुष विजेत्यांना गोव्यात होणाऱ्या आयर्न मॅन 70.3 या स्पर्धेचे फ्री तिकीट मिळणार आहे. 250 स्वयंसेवक या स्पर्धेसाठी सज्ज असून सुरक्षिततेसाठी डॉक्टर व अंबुलन्स यांची व्यवस्था आहे. स्पर्धा हाफ आयर्न डिस्टन्स ट्रायथॉलॉन, ऑलम्पिक डिस्टन्स ट्रायथॉलॉन, स्प्रिंट डिस्टन्स ट्रायथॉलॉन, हाफ आयर्न रिले ट्रायथॉलॉन, ऑलम्पिक ड्यअथलॉन, स्प्रिंट ड्यअथलॉन,स्प्रिंट रन ड्यअथलॉन अश्या सात प्रकारांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत रगेडीयन चे सहकार्य लाभले आहे.
पत्रकार परिषदेस आकाश कोरगावकर,डॉ. प्रदीप पाटील,डॉ. विजय कुलकर्णी, आशिष तंबाके आदी उपस्थित होते.