+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustआमदार सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारक adjustगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्‍साहात adjustकाँग्रेसने निष्ठावंतांना उमेदवारी का दिली नाही ; राजेश क्षीरसागर adjustसत्यजित कदम, कृष्णराज महाडिक करणार राजेश क्षीरसागर यांचा प्रचार adjustअमल महाडिक यांच्यानंतर दोन महाडिक बंधूंची उमेदवारीसाठी तयारी adjust...तर राजेश क्षीरसागरांचा प्रचारक मी असेन; धनंजय महाडिक adjustगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील adjustगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील adjustसमाजकारणाचा वारसा जपणारे अमल महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार adjustसमाजकारणाचा वारसा जपणारे अमल महाडिक यांना विजयी करण्याचा निर्धार
schedule23 Jul 24 person by visibility 123 category

कोल्हापूर : 
विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर येथील लोकांच्या वस्तीवर हल्ला करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध संघटनेच्या वतीने करण्यात आली.
विशाळ गडावरील घटनेचे तथ्य शोधन करण्यासाठी असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम या संस्थांनी मिळून हि भेट आयोजित केली होती, 
गजापुर मध्ये हल्ल्याचे बळी पडलेल्या, खास करून शिराज कासम प्रभुलकर, रजा जामा मशीद या ३०० वर्षे जुन्या मशीदच्या ट्रस्ट चे अध्यक्ष आणि इतर ग्रामस्थ, कोल्हापूर शहरात काही लोकांची भेट घेतली.
या भेटीत खालील बाबी आढळून आल्या.
1. हा हल्ला पूर्व नियोजित हल्ला होता. गजापुर गावातील मुस्लिम लोक तेथील स्थानिक आहेत, त्यांनी जमीनी अनधिकृत रीत्या बळकावलेल्या नाहीत, त्यांच्या कडे जमिनीचे घराचे कागद पत्र आहेत, मशीदीचेही कागद पत्र आहेत. मोठ्या प्रमाणावर या गावातील मुस्लिम पुरुष मुंबई व इतर ठिकाणी नोकरी कामधंदा करतात. सणासुदीला कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यास येतात. त्यांचा आणि विशाळ गडावरील अनधिकृत स्टॉलशी काहीच संबंध नाही.
2. हल्ले खोरांच्या हातात, तलवार, हातोडे, सब्बल होते.
3. हल्ला करण्याचे कारण राजकीय आणि सांप्रदायिक दिसतं कारण विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना हा हल्ला झाला आणि मुस्लिम समुदायातील लोकांवर हल्ला झाला ज्यांचा अतिक्रमनाशी काहीच संबंध नाही. गाजापुर हे गाव विशाळ गडपासून ५ किमी दूर आहे. त्यांच्यावर हल्ला मुस्लिम असल्या मुळेच केला.
4. अतिक्रमण करणारे सगळे बाहेरचे लोक होते, स्थानिक व्यक्ती नारायण पांडुरंग वेल्हार यांच्या घरी अगोदर, रवींद्र पडवळ यांच्या पुढाकाराने काही मीटिंग झाल्या होत्या, ज्यांचे नाव एफ आय आर मध्ये देखील आहे.
5. एफ.आय.आर मध्ये नारायण पांडुरंग व्हेल्हार यांचे नाव दिले असता पोलिसांनी ते घेतले नाही.
6. पोलिसांनी जो बंदोबस्त करायला पाहिजे होता तेवढी त्यांनी दक्षता घेतली नाही. पोलिसांनी त्या वेळेसच नाकाबंदी केली पाहिजे होती, पोलिसांनी दक्षता पूर्वक कर्तव्य बजावले नाही. त्या निष्काळजी पणा मुळे गजापुर गावातील घरे आणि दुकाने मिळून ४१ आणि ३०० वर्षे जुनी एक मजीद असे एकूण ४२ वास्तू तोडल्या. तसेच ५१ वाहने त्यात १७ चार चाकी आणि ३४ दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. हा हल्ला काही लोकांच्या मते स. 11 तर काहींच्या मते दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ एवढ्या दीर्घ कालावधीत चालू होता. एका घरातील रू. नव्वद हजार सहा तोळे सोने लुटले. दुसऱ्या दोन घरातील प्रत्येकी ३ टोळे सोने आणि काही पैसे लुटले. धन्य कडधान्ये फेकून टाकले, टी. व्ही, कपाटे, फ्रिज, लाईट कनेक्षण असे जे मिळेल त्याची नास धुस केली. कुराण ची कॉपी जाळली. मशीदची तोडफोड केली आणि कब्रस्थान चे कुंपण तोडले. ज्या घरातील लोकांनी मिरवणूक जाताना पाणी मागितल्यावर पाणी दिले, पाऊस होता म्हणून छत्री आणि रेनकोट दिले त्याच घरात दोन सिलिंडरचा स्पोट केला. मिरवणुकी मध्ये पंधरा हजार लोक होते पण अंदाजे पंधराशे लोकांनी हल्ला केला.
7. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडनविस, यांनी हल्ल्याचा निषेध न करता, करता विशाळ गडा वरून अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिले आणि १५ जुलै ला वर्तमान पत्रात नमूद केल्या नुसार विशाळ गडावरील ३५ अनधिकृत दुकाने तोडली.
8. हिंसक जमावाने पोलिसांवर देखील हल्ला केला त्यात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले. मुस्लिम समुदायातील लोक जंगलात पळून गेले होते म्हणून वाचले नाहीतर जीवघेणा हल्ला झाला असता. त्यातील एका व्यक्तीला, याकूब मोहम्मद प्रभुलकर अपंग असल्या मुळे पळता येत नव्हते त्याच्या पायाला दोन आणि हाताला एक फ्रॅक्चर झाले, जो आता प्राणी रुग्णालयात उपचार घेत आहे.
9. संजय पाटील, राजू कांबळे, मंगेश कांबळे, पांडुरंग कोंडे, मारुती निबले, चंद्रकांत कोकरे असे सर्वच समाजाचे लोक संध्याकाळी गजापुर गावातील मुस्लिम लोकांना धीर देण्यासाठी आले व त्यांच्यासाठी जेवण देखील घेऊन आले होते.
10. सर्व प्रथम व्यवस्थित गजापूर गावातील लोकांचे नुकसानीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई सरकारने तातडीने दिली पाहिजे. सध्या सरकारने दिलेले रू. २५०००/- चेक अगदीच अपुरा आहे.
11. प्रत्येक नुकसानीचे वेगवेगळे एफ. आय. आर झाले पाहिजेत. 
12. एस.आय. टी नेमून उच्च न्यायालयाच्या निगराणी खाली त्याची चौकशी व्हावी व दोषींना कडक शिक्षा व्हावी. त्यांच्यावर दहशत वादाचा गुन्हा दाखल व्हावा. 
13. ह्या हल्ल्याचा कट कोणी, कधी आणि कुठे केला, याचा मुळ सूत्रधार कोण आहे हे शोधून काढावे.
14. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी लोक व इतर भाजप चे आमदार यांच्या कडून बरीच द्वेष जनक भाषणे दिली गेली आहेत. महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे, त्याचे रूपांतर हिंसेमध्ये होणार यात शकांच नाही. द्वेष जनक भाषनांवर देखील शासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे.

यावेळी 
  इरफान इंजिनिअर, (संचालक, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम), अस्लम गाझी (एकझिक्युटिव्ह प्रेसिडेंट ए. पी. सी. आर), मेराज सिद्दीकी (मुस्लिम हुमाईंदा कौन्सिल, औरंगाबद)
अभय टक्साळ, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया; प्रीतम घनघावे, (शिक्षक; मिथिला राऊत, वोलंटीअर, सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलॅरिझम) मजहर फारुकी(मेंबर ए. पी.सी.आर), अब्दुल मुजीब( सेक्रेटरी जमत ए इस्लामी जालना),
इस्माईल शेख(जे. आय. एच.कोल्हाूर), अश्फाक पठाण, (पी.आर.ओ; एस.आय, कोल्हापूर) उपस्थित होते.