Awaj India
Register
Breaking : bolt
संविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*नवीन शैक्षणिक धोरणातील कार्यभार व CHB प्राध्यापकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्याबालकांसाठीचा पोक्सो कायदा

जाहिरात

 

जिल्ह्यात 16 मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम;

schedule06 Mar 26 person by visibility 693 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर,  : जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. या अपघातांमध्ये हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचे आढळून आले आहे. 
 
या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 16 मार्चपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
 विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर हा केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचविण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघाताच्या वेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने (पट्टा घट्ट बांधून) वापरणे अत्यावश्यक आहे. वाहन चालविताना चालकासह मागील आसनावरील प्रवाशाने देखील हेल्मेट परिधान करणे अनिवार्य आहे.
 
तसेच राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किणी टोल नाका येथे “No Helmet No Entry” अभियान राबविण्यात येत असून विना हेल्मेट दुचाकीस्वारांना महामार्गावर प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालवू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि “हेल्मेट वापरा- जीवन वाचवा” हा संदेश सर्वत्र पोहोचवावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी केले आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes