ऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेट
schedule14 Jul 26 person by visibility 31 categoryराजकीय
कोल्हापूर:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, तसेच सन १९२० मधील ऐतिहासिक 'माणगाव परिषदे'ची साक्ष असलेल्या हातकणंगले तालुक्यातील मौजे माणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेला आज जिल्हा परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून भेट दिली .
याच शाळेच्या इमारतीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य होते, ज्यामुळे या वास्तूला मोठे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या विनंतीची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम व आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर समाज कल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, महिला व बालकल्याण सभापती विद्या विलास पाटील, शिक्षण समिती सभापती शितल प्रवीण यादव, जिल्हा परिषद सदस्या रेखाताई प्रकाश मुगडे, पंचायत समिती सभापती अश्विनी अनिल बिरांजे, जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, प्रशांत शहापुरे, कुमार कांबळे राहुल आवळे, वर्षा सावर्डेकर, सोनाली सावंत, अतिश शिंगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, आदी मान्यवर उपस्थित होते.