Awaj India
Register
Breaking : bolt
बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पणबँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणीश्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धारचाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदान

schedule16 Jul 26 person by visibility 346 categoryसामाजिक

​कोल्हापूर:
राजार्र्षी महोत्सवानिमित्त 'समाजक्रांती सांस्कृतिक चळवळ कोल्हापूर' यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा प्रतिष्ठित "लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार" रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु. मा. बबनराव शिंदे यांना काल रविवारी (१२ जुलै २०२६) एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.
​शाहू स्मारक भवन येथे या विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मा. बबनराव शिंदे यांनी गेल्या तीन दशकांत (३० वर्षे) सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
​महाराष्ट्र सुप्रसिद्ध विचारवंत कवी मा. नितीन चंदनशिवे व मा. सरोज पाटील (माई) या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिंदे यांना पुरस्काराचे मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
​या सोहळ्याला रि.पा.ई. (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष मा. उत्तमदादा कांबळे, मेघाताई पानसरे, माजी आमदार राजीव आवळे, वैभव प्रधान सर, संदीप हेर्लेकर, प्रविण कडोलीकर, मारुती गायकवाड यांच्यासह अनेक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बबनराव शिंदे यांच्या या बहुमानाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes