Awaj India
Register
Breaking : bolt
बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पणबँकांनी पतपुरवठा आराखड्याचे अर्ध वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे*जिल्हा परिषदेत गणेशोत्सव रद्द करू नका; सदस्यांची अध्यक्षांकडे मागणीश्री कौस्तुभ गावडे यांना विधानपरिषदेमध्ये पाठविण्याचा शिक्षकांनी केला ठाम निर्धारचाळीस वर्षे समाजकारणाची परंपरा पुढे नेणारे उपमहापौर अक्षय जरग गोकुळची निवडणूक ताकदीने लढवणार: पाच लाख दूध उत्पादकाच्या पाठीशी राहणार डॉल्बीला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेशोत्सवाची सुरुवात उपमहापौर अक्षय विक्रम जरग यांच्या वाढदिवसानिमित्त २४७ रक्तदात्यांनी केले रक्तदानडी. वाय. पाटील अभियांत्रिकी* *एआयएमएलच्या ६८ विद्यार्थ्यांना जॉब ऑफर्सशाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात

 

बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पण

schedule28 Aug 26 person by visibility 119 categoryराजकीय

बागल चौक दफनभूमीसाठी जेसीबी मशीनचे लोकार्पण
कोल्हापूर : शहरातील मुस्लिम समाजाच्या बागल चौक येथील दफनभूमीत मयत व्यक्तींच्या दफनासाठी कबर खुदाई करण्याकरिता जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी पूर्ण झाल्याने मुस्लिम समाजातून समाधान व्यक्त होत आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि शिव अल्पसंख्यांक सेनेचे कोल्हापूर-सांगली जिल्हा संपर्कप्रमुख रियाज भाई बागवान यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत हे जेसीबी मशीन उपलब्ध करून देण्यात आले.
या मशीनच्या लोकार्पण सोहळ्यास मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गनी आजरेकर, प्रशासक कादरभाई मलाबारी, उपाध्यक्ष आदिल फरास, संचालक हाजी पापाभाई बागवान, जहांगीर अत्तार, रफीक शेख, रफीक मणेर, अल्ताफ झांसी, मलिक बागवान, नगरसेवक आशकीन आजरेकर, राजूभाई अत्तार, इकबाल देसाई, राजू नदाफ, अलाउद्दीन नाकाडे, एजाज नाकाडे, नईम बागवान, बागल चौक मस्जिदचे अध्यक्ष अजीज जमादार, तसेच फिरोज मुजावर, मूसा पटवेगार, बालेचांद मालदार, रहीम सनदी, हिदायत मणेर, फिरोज बागवान, इसाक पाथरवट, फारूक अत्तार, निसार बागवान, राजू बागवान, आदम बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
जेसीबी मशीन उपलब्ध झाल्यामुळे दफनभूमीत कबर खुदाईचे काम अधिक सुलभ व जलद होणार असून, गरजेच्या वेळी नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे. या सुविधेसाठी संबंधित मान्यवरांचे मुस्लिम समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes