चंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यात
schedule10 Jan 25 person by visibility 60 categoryगुन्हे
कोल्हापूर
सुळये (ता. चंदगड) येथे जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेतील विहिरीचे पैसे पाण्यात गेले असल्याचा प्रकार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला. ठेकेदार यांनी विहिरीचे पैसे दिले नसल्याचा आरोप केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी एस कार्तिकेयन अधिकारी यांना निवेदन दिले.ठेकेदार बसवंत अडकुरकर यांच्या सहमतीने वीहीर खूदायचे काम करण्यात आले. या खुदाईसाठी ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या निधीतून खर्च करून लोकसहभागाने विहीर खोदली. जिल्हा परिषदेचे बिल मिळाले तरी ठेकेदार यांनी बिल दिले नाही. त्यांनी फसवणूक केलेले आहे. वेळेत काम पूर्ण केलेले नाही. त्यांनी विहीर खोदायचे पैसे द्यावे उर्वरित काम पूर्ण करावे, अन्यथा 26 जानेवारी आत्मदहन करणार असल्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला यावेळी ब्लॅक पॅंथर चे अध्यक्ष सुभाष देसाई, रमेश गावडे, सुधारक कांबळे, गोपाळ गावडे, चन्नाप्पा गावडे, महादेव हजारे, शामराव कांबळे, बाळू कांबळे, मनोहर धुरी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत याबाबत ठेकेदार बसवंत अडकुरकर म्हणाले जितकं काम झालेले आहे तितकाच निधी घेतलेला आहे ग्रामस्थांचं मत खरे असले तरी लोकसहभागातून उल्लेख केल्यामुळे निधी काढण्यास अडचणी निर्माण होत आहे.