*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.*
schedule17 May 24 person by visibility 345 category
कोल्हापूर ;
वार्ताहर-
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. प्रविण माने यांना बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिकी विद्यापीठाकडून पीएच.डी. जाहीर झाली आहे.
मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या प्रा. माने यांनी "अॅनालेसीस अँड ऑप्टिमाइझेशन ऑफ टर्निंग प्रोसेस पॅरामीटर्स फॉर इंकोनेल ७१८ कॉपर ओक्ससाईड बेस्ड नॅनोलुब्रिकेशन विथ मिनिमम क्वांटीटी लुब्रिकेशन" या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यांना डॉ. ए. न. कल्लोळ यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. माने यांनी मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी अभिनंदन केले.