Awaj India
Register
Breaking : bolt
जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचनासंविधान साक्षर शाळेच्या उपक्रमातून सामाजिक परिवर्तनाचा ध्यासआदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्रा. तुळशीदास हरी कांबळे यांची निवडडॉ. दत्तात्रय केरबा कांबळे यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीरअंगणवाडी सेविकेच्या कार्याची उल्लेखनीय कामगिरी; ज्योती कांबळे यांचा गौरवपल्लवी गोसावी यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडतंत्रस्नेही शिक्षक म्हणून शहाजी गायकवाड यांची उल्लेखनीय कामगिरीडॉ. हरीश भालेराव यांची ‘नॅशनल आयडियल टीचर लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०२६’साठी निवडडी. वाय.पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा* *देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकार*

जाहिरात

 

जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर*

schedule07 Sep 26 person by visibility 1 categoryराजकीय

 

नामदार प्रकाश आबिटकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून बांधकाम व आरोग्य समिती  सभापती  सौ. सारिका यशवंत नांदेकर यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर, दि. : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सुसज्ज व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने राज्य स्तर १५ व्या वित्त आयोगांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींच्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य उपकेंद्रासाठी रु. ६१ लाख इतका निधी उपलब्ध होणार असून, एकूण अंदाजे रु. १८ कोटी ९१ लाख इतका निधी या कामांसाठी उपलब्ध होणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आरोग्य उपकेंद्रांच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बाब आहे.

आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून आमदार व जि प सदस्या कडून करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती सौ. सारिका यशवंत नांदेकर यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. प्रकाश आबिटकर यांच्याकडे शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यास सकारात्मक प्रतिसाद मिळून ३१ आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुकानिहाय मंजूर आरोग्य उपकेंद्रे

१. भुदरगड तालुका – ७ उपकेंद्रे
- तिरवडे
- वेसर्डे
- सोनारवाडी
- निळपण
- वाघापूर
- मडिलगे
- मुदाळ

२. राधानगरी तालुका – १ उपकेंद्र
- लिंगाचीवाडी

३. पन्हाळा तालुका – २ उपकेंद्रे
- पाटपन्हाळा
- हरपवडे

४. गडहिंग्लज तालुका – ६ उपकेंद्रे
- हरळी बु.
- चन्नेकुपी
- गिजवणे
- करंबळी
- वडरगे
- दुरंडे


५. कागल तालुका – १ उपकेंद्र
- बेलवळे बु.

६. चंदगड तालुका – १ उपकेंद्र
- बसर्गे

७. शाहूवाडी तालुका – ६ उपकेंद्रे
- कडवे
- गजापूर
- रेठरे
- तुरुकवाडी
- कापशी
- सावते

८. हातकणंगले तालुका – ४ उपकेंद्रे
- घुणकी
- वाठार
- कबनूर
- तारदाळ

९. शिरोळ तालुका – ३ उपकेंद्रे

- टाकवडे
- शिरटी
- हासूर

एकूण – ३१ उपकेंद्रे

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळकटी

जिल्ह्यातील काही आरोग्य उपकेंद्रांच्या विद्यमान इमारती जुन्या, अपुऱ्या किंवा आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीने आवश्यक सुविधांनी परिपूर्ण नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना तसेच नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन व सुसज्ज इमारती उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य सेवांचे नियोजन व अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करणे शक्य होणार आहे.

नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बाल आरोग्य सेवा, लसीकरण, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे निदान व तपासणी, आरोग्य जनजागृती, विविध शासकीय आरोग्य योजनांची अंमलबजावणी आदी सेवा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देता येणार आहेत.

या निधीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाच्या परिसरातच गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या निर्णयाबद्दल जिल्ह्यातील नागरिक, ग्रामस्थ तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून, मंजूर निधीतून संबंधित आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन इमारतींचे बांधकाम नियमानुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

*_-सौ.सारिका यशवंत नांदेकर_*
   सभापती- बांधकाम व आरोग्य समिती 
          जिल्हा परिषद, कोल्हापूर.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes