+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...!
schedule11 Jul 22 person by visibility 258 categoryसंपादकीय
गारगोटी प्रतिनिधी
 
     भुदरगड शिक्षण संस्था संचालित गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनि.कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त गारगोटी शहरातून वारकरी दिंडी काढली. या दिंडीत विठ्ठल, रखुमाई यासह संतांच्या वेशातील विद्यार्थी रथात बसले होते. यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी पारंपारिक वेषभूषेत दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीस पालक वर्गासह समाजातील सर्व घटकाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दिंडी मार्गात विद्यार्थ्यांनी पाऊल भजन सादर केले. विठ्ठल मंदिरात महाआरती पार पडली.
     या दिंडीचा शुभारंभ ह.भ.प. शहाजी पांढरे, ह.भ.प.विश्वनाथ देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पारंपारिक पध्दतीने सजविलेला रथ, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसह टाळ व मृदूंगाच्या गजरात दिंडी नेण्यात आली. मार्गावर अनेक ठिकाणी महिलांनी दिंडीचे स्वागत व पालखीचे पूजन केले. हुतात्मा क्रांती चौक, महादेव मंदिर चौक व श्री.साई मंदिरासमोर रिंगण सोहळा पार पडला. रिगण सोहळा पाहण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांना विठ्ठल भजनी मंडळाच्या वतीने फराळ वाटप करण्यात आला. याकामी श्री. स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त श्री. गणेश पाठक, ह.भ.प.राम कळंबेकर, सौरभ डेकोरेटर्सचे बाजीराव शिंदे, श्री. रणजित कल्याणकर यांचे विशेष सहकार्य लाभले. 
    यावेळी मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर, विभागप्रमुख आर.पी.गव्हाणकर, आर.वाय.देसाई, व्ही.एम.पाटील, जी.डी.ठाकूर, आर.डी.पोवार, एस.एस.नाईक, पी.पी.भंडारी, एच.आर.शिंदे, डी जी.लकमले, डी. एस.ससे, एस.एम.साळवी, सौ.आर.आर.बहादुरे, श्रीमती एन.बी.चांदके, सौ.लता पाळेकर, ह.भ.प.राम कळंबेकर संदीप चव्हाण, रणजीत देसाई, शिवाजी भराडे, अजित शिंदे, प्रा.शेखर देसाई, प्रा. टी. एम. पाटील, सौ. आर. एस. निकम, सौ. स्नेहा साळोखे, माजी सरपंच नामदेव शिंदे, अमृत देसाई, विजय स्मार्त, बाळासो मिसाळ, सौ. मंगल कांबळे यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.