Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*

जाहिरात

 

डॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*

schedule01 Jul 26 person by visibility 13 category

कृषी क्षेत्रातील असीम योगदानाबद्दल राज्यपालांच्या हस्ते गौरव 
 
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्र्यासह मान्यवरांची उपस्थिती 
 
मुंबई/ प्रतिनिधी 
कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च ,'डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न' पुरस्कारने राज्यपाल डॉ. जिष्णू देव वर्मा यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. पत्नी सौ. वैजयंती पाटील यांच्या समवेत डॉ. पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 
समृद्ध, शाश्वत व आधुनिक शेतीच्या माध्यमातून महाराष्ट्र वैश्विक स्तरावर देशाचे नेतृत्व करेल असा विश्वास राज्यपाल वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
 
कृषी विभागामार्फत 2023 व 2024 सालच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण बुधवारी कृषी दिनी मुंबईतील वरळी येथे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्य मंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईल, कृषी सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सुरज मांढरे , कृषी संचालक रफिक नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
  यावेळी कृषी क्षेत्रातील सर्वोच्च डॉ. पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार २०२३ ने डॉ. संजय डी. पाटील तर २०२४ साठी यज्ञेश सावे याना सन्मानित करण्यात आले. एकूण १८९ कृषी पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. 
 
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले,
आपण सर्वजण महान कृषी संस्कृतीचे वाहक, प्रेरणा स्रोत आहात. आपल्या कार्यामुळे 
पुरस्काराचा सन्मानही वाढला आहे.
 
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकरी शाश्वत शेतीकडे वळतील याची खात्री आहे.
 
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्यांनी इतरांसाठी दिशादर्शन, मार्गदर्शन करावे. त्यांच्या प्रगतीसाठी काम करावे. 
  
  कृषी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल यांनी आभार मानले. 
 
यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, सौ. वैजयंती संजय पाटील, माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, सौ. सुप्रिया चव्हाण पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, सौ
राजश्री काकडे, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील,सौ. स्नेहा तेजस पाटील, देवश्री पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील यांच्यासह पाटील कुटुंबीय, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, डॉ. महादेव नरके, डी. एन शेलार, अमोल गाताडे, पी. डी. उके, कृषी विज्ञान केंद्र तळसंदेचे प्रमुख जयवंत जगताप व सहकारी, डी. वाय. पाटील ग्रुपचे अधिकारी, पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
*पाटील यांचे कार्य शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल -कृषी मंत्री* 
डॉ. संजय पाटील यांनी आधुनिक व प्रयोगशील शेती, कुकुट पालन, दुग्ध उत्पादन, सनशाईन हा शेतकरी ब्रँड विकसित करत कृषी क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. डॉ. पाटील यांचे कार्य शेतकऱ्यासाठी 
रोल मॉडेल असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
 
 
*मुख्यमंत्र्यांकडून गौरवोद्गार*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
डॉ. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. पाटील यांनी कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून अनेकाना बळ देऊन शेतीत आधुनिकता आणली.शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी अखंडपणे ते कार्यरत आहेत.
तीन विद्यापीठांचे कुलपती म्हणूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे कार्य उभारल्याचे गौरवदार त्यांनी काढले.
 
 
*प्रतिक्रिया*
 हा सन्मान माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व शेतकरी बांधव, सहकारी, संशोधक, विद्यार्थी आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाचा आहे. भविष्यातही शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न कायम राहतील
*-डॉ. संजय डी. पाटील*

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes