Awaj India
Register
Breaking : bolt
*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*महिलांचे आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रासमोरील मोठे आव्हान: लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर* करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफ

जाहिरात

 

कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोस

schedule27 Jun 26 person by visibility 826 categoryआरोग्य

*राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्या शुकोल्हापूर,: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील मोहिमेचा शुभारंभ रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता सेवा रुग्णालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.  

भारताला मार्च २०१४ मध्ये पोलिओमुक्त देशाचा दर्जा मिळाला असला, तरी शेजारील काही देशांमध्ये पोलिओचा प्रसार सुरू असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रात १९९५ पासून ही मोहीम सुरू असून, कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ५९ फेऱ्या यशस्वीपणे पार पडल्या आहेत. जिल्ह्यातील शेवटचा पोलिओ रुग्ण २३ ऑगस्ट १९९९ रोजी शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी येथे आढळला होता.  

यंदा कोल्हापूर मंडळात ६,५९२ लसीकरण बूथवर ६ लाख २२ हजार ८९७ बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. त्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यात २,०८९ बूथवर २ लाख ८६ हजार ९१७ बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येणार आहेत. दि. २९ जूनपासून घरभेटीद्वारे लसीकरणासाठी जिल्ह्यात २,५७२ पथके कार्यरत राहणार आहेत.  

याच कार्यक्रमात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील २९१ लाभार्थी बालकांना श्रवणयंत्रे, व्हीलचेअर, वॉकर, कुबड्या, कमोड, रोलेटर वॉकर आदी सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. सन २०२५-२६ मध्ये जिल्ह्यातील ५,००८ बालकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes