Awaj India
Register
Breaking : bolt
करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:गोकुळमध्ये राष्ट्रवादीच ‘मोठा भाऊ’; जागावाटपाचा तिढा चर्चेतून सुटेल : हसन मुश्रीफकास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड;राजारामपुरीत अवतरणार श्री कालभैरव सर्वसामान्य असूनही समाजसेवेचा ‘अनिल पवार पाचगावकर’ पॅटर्न!स्मार्ट मीटर बसविण्याच्या कारवाईस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा तीव्र विरोधअंतरंग हॉस्पिटलचा तत्पर प्रतिसाद: अपोलो हॉस्पिटलची आणखी एक यशोगाथाभारतीय बौध्द महासभेच्या वतीने डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ सप्टेंबरला जाहीर स*आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीप्रकरणी आरती आंबी पुणे कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार...* *डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला* *‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे*

जाहिरात

 

करवीर पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा:

schedule13 Sep 26 person by visibility 10 category


अनियमितता, मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य आक्रमक

कोल्हापूर :

 करवीर तालुक्यातील उजळाईवाडी ग्रामपंचायतीच्या कारभारात कथित अनियमितता, मनमानी व विकासकामात गैरप्रकार झाल्याचा आरोप  सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांच्या सह विद्यंमान आठ  ग्राम  पंचायत सदस्यांनी पत्रकार परिषदेत केली. सर्व पूराव्यानिशी  पत्रकार परिषदेत माहिती देऊन करवीर पंचायत समितीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या वेळी राजू माने म्हणाले की ग्रामसभेच्या किंवा गटविकास अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय नागरिकांकडून विकास निधी गोळा केला जात आहे.त्याची चौकशी  चौकशी करावी त्याच बरोबर ग्रामपंचायतीतील बांधकाम परवानग्या, पाणी कनेक्शन तसेच इतर कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. १६  फ्लॅटधारकाच्या पाणी कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेस राजू माने, माजी पंचायत समिती सदस्य अरुनिमा माने, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकांत पडित, अशोक लांडगे, विनायक बागणे, पोपट नाईक, माधुरी दळवी, विलास कुंभार, यांच्या सह ग्रामस्थ व  सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes