राजारामपुरीत अवतरणार श्री कालभैरव
schedule11 Sep 26 person by visibility 11 category
कोल्हापूर : आवाज इंडिया
राजारामपुरी येथील सहाव्या गल्लीतील तांत्रिक देखाव्यासाठी सुप्रसिद्ध असणाऱ्या राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळ यांनी यंदाही आपले वेगळेपण जपत श्री कालभैरव हा हलता भव्य तांत्रिक देखावा साकार केला आहे. गेले आठ दिवस सदर देखावा करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे यंदाच्या वर्षी आपल्या भारत देशातील हायड्रोलिकपंपाच्या साह्याने हलते देखावे तयार करण्यासाठी जगप्रसिद्ध असणारे एम सुरेंद्रम व त्यांची टीम यंदा मंडळाचा देखावा साकारत आहेत. देखाव्यामध्ये २१ फुट उंचीची कालभैरवांची मूर्ती गुडघ्यावर बसलेले आहेत. समोरच्या बाजूने ६ फुट लांबीच्या डुकरावरुन बसलेल्या राक्षस कालभैरवांसोबत युद्ध करण्यासाठी येतो. दोघांच्या मध्ये युद्ध होते राक्षसाचा वध करतात व डुकरावरुन खाली कोसळतो. यानंतर क्रोधात असलेली कालभैरवांची २१ फुटांची मूर्ती हायड्रोलिक पंपाच्या साह्याने गुडघ्यावरून उभी राहते व ही २१ फुटांची मूर्ती जोरात तांडव नृत्य करण्यास सुरुवात करते मूर्ती उभारून तांडव नृत्य करणारा क्षण 'याची देही याची डोळा' असणार आहे. या नंतर श्री कालभैरवांना शांत करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे हायड्रोलिक च्या साह्याने सिंहावर बसलेले देवी येऊन श्री कालभैरवांचा राग शांत करते या देखाव्यातील बहुतांशी हालचाली या हायड्रोलिक पंपाच्या साह्याने होणार आहेत .या देखाव्यात ३० अश्वशक्तीचे २ पंप वापरले आहेत.साधारणत: हा देखावा ५ ते ६ मिनिटांचा आहे. आत्तापासून गल्लीमध्ये देखाव्याची जोडकाम पाहण्यास गर्दी होत आहे लहान मुलांपासून वयोवृधांपर्यंत यादेखाव्याची आकर्षण आहे. दहा तंत्रज्ञ व मंडळाचे कार्यकर्ते सदर देखावा काम करत आहे. 15 सप्टेंबर पासून हा देखावा भाविकांसाठी खुला होणार आहे. चालू वर्षी आज पर्यंतच्या सर्व गर्दीचा उच्चांक मोडला जाईल . असे मंडळाचे कार्याध्यक्ष धनराज माने, अध्यक्ष योगेश कुलकर्णी उपाध्यक्ष आदित्य हुलजी,विनित कागले यांनी सांगितले. आज पर्यंत राजारामपुरी जय शिवराय तरुण मंडळाने विविध सामाजिक प्रश्नावर प्रकाश झोत टाकणारे देखावे सादर केले आहे याबद्दल निमित्त पुरस्काराने मांडला गौरवण्यात आले आहे.