Awaj India
Register
Breaking : bolt
*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करूया: शुभांगी अडसूळचर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी पुढाकार घेणार - अमल महाडिकसिंधी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध - अमल महाडिकआ.ऋतुराज पाटील यांना रेकॉर्डब्रेक मताधिक्य देऊया : खासदार शाहू महाराजमहिला तुमच्या पंपावर पैसे मागायला आल्या होत्या का? : विजय गायकवाडपर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार - राजेश क्षीरसागर बाळेकुंद्रीच्या श्री पंत महाराजांचा आशीर्वाद सदैव माझ्या डोकीवर*

जाहिरात

 

*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिक

schedule18 Nov 24 person by visibility 83 categoryराजकीय

*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिक* 
 
कोल्हापूर - आजवर मतदारसंघातील नागरिकांच्या कल्याणासाठी केलेली कामे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गावागावातील महिलांचा मिळणारा पाठिंबा, सभांचा भरघोस प्रतिसाद, पदयात्रेला केले जाणारे स्वागत या सगळ्याच्या जोरावर २३ रोजी मताधिक्य घेऊन आम्हीच गुलाल उधळणार, असा विश्वास गोकुळच्या संचालिका सौ. शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला. 
 
दिंडनेर्ली येथे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. "अमल महाडिक यांनी सातत्याने लोकांच्या कल्याणाची कामे केली आहेत. मतदारसंघातील शेवटच्या घटकापर्यंत सर्व सोयी सुविधा पोहोचाव्यात यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. आपल्याकडे मदत मागायला येणार माणूस आपल्या मतदारसंघातीलच हवा असे कधीच त्यांचे म्हणणे नसते. प्रत्येकासाठी ते सदैव तत्पर असतात." असे त्यांनी सांगितले. 
 
"अमल हे शांतपणे काम करणारे आहेत. त्यांच्या या शांत व सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाची आता प्रत्येकाला ओळख झाली आहे. आपण त्यांच्याकडे गेलो आहे, म्हणजे आपले काम नक्की होणार हा विश्वास नागरिकांना आहे. या प्रचाराच्या दिवसांमध्ये ते जिथे जिथे सर्वानी त्यांचे व महायुती सरकारच्या योजनांचे भरभरून कौतुक केले. आपल्या हक्काचा माणूस समजून त्यांची गाऱ्हाणी मांडली. तुम्ही आमचे प्रश्न सोडवाल याची खात्री आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी कमावलेली ही संपत्ती त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे विजय अमल महाडिक यांचाच आहे." असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 
 
येत्या २० रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून त्यांचा विजय निश्चित करा. कोल्हापूरच्या विकासाचे एक नवे पर्व महाडिक यांच्या हस्ते सुरु होणार आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
सभेला सरपंच मंगल कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य संध्याराणी बेडगे, कावणे गावच्या सरपंच शुभांगी पाटील, माजी सरपंच आऊबाई पाटील, उपसरपंच सुप्रिया बेडगे, सुप्रिया पाटील, करवीर पंचायत समितीच्या माजी उपसभापती सावित्री पाटील, सविता पाटील, मुनेरा मुल्लाणी, प्रियांका काईंगडे, प्रताप पाटील, विलास बेडगे, युवराज वाडकर, सुरेश पाटील, मुरलीधर सुतार, दशरथ सरवळ, महादेव पाटील, तानाजी एकले, काशिनाथ मेटिल, सुमित चौगुले यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक महिला, युवा व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes