Awaj India
Register
Breaking : bolt
बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी*घरफोडी टोळीचा पर्दाफाश; ४ आरोपी अटकेत, ८.५० लाखांचा मुद्देमाल जप्तआदिल फरास साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य “कोल्हापूर थाळी”चे आयोजननगरसेवक आदिल फरास यांच्या वाढदिवसानिमित्त पांजरपोळ येथे चारा दानबाजार समितीच्या तीन संचालकांना 'कारण दाखवा' नोटीस; नातेवाईकांच्या नावे गाळा घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवारआरोग्य समिती बैठकीत सदस्यांच्या ठोस सूचनांचा वर्षाव; ग्रामस्तरापासून जिल्हास्तरापर्यंत उपाययोजनांवर भरकोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे यांची संघर्षमय वाटचालशिक्षण क्षेत्रातील ‘ज्ञानज्योती’ निमालीबुद्ध जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान व बौद्ध वधू-वर मेळावा; डिंगे फाउंडेशनचा उपक्रमगोकुळ’च्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रक

जाहिरात

 

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी*

schedule07 May 26 person by visibility 16 categoryशैक्षणिक

आवाज इंडिया प्रतिनिधी 
 
कोल्हापूर : राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे 3500 रोजगाराच्या संधी उपलब्धतेबाबतची जाहिरात https://maharashtrainternational. com या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME BASED CAREGIVER) या क्षेत्रात युवक युवतींना रोजगाराची संधी आहे. 
 
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 वी पास, इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्या व 25 ते 45 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू (घरगुती सहाय्यक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान 990 तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे (ऑन जॉब ट्रेनिंग सह). भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक, तसेच जीडीए/एएनएम/जीएनएम/बीएससीनर्सिंग/ पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
 
मुलाखत प्रक्रिया ऑनलाइन व व्हिडिओ रेकॉर्डेड पध्दतीने होईल. निवड/नकाराचा अंतिम निर्णय इस्त्रायली नियोक्ता घेईल. मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे. पात्र उमेदवारांना अंदाजे रु.1,99,770/- पर्यंत मासिक वेतन दिले जाईल.
 
जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational. com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी व Latest Jobs New या टॅबवर क्लिक करुन आपला अर्ज भरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागामार्फत सहायक आयुक्त जमीर करीम यांनी केले आहे. 
 
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर, सी बिल्डिंग, शासकीय निवासस्थान, कावळा नाका, कोल्हापूर (दूरध्वनी क्र. 0231-2545677) येथे संपर्क साधावा. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes