+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustसतेज पाटलांनी सहकारावर बोलणे ही सहकाराची चेष्टा - अमल महाडिक adjustरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आ ) कोल्हापुर शहर कार्यालयास सदिच्छा भेंट adjustनॅशनल बँक पॅंथर पार्टीचा रविवारी मेळावा adjust*डॉ. संजय डी. पाटील यांचा* *' नवरत्न'पुरस्काराने सन्मान* adjustजागतिक ओझोन दिन adjustराजारामपुरीत साकारणार भव्य तिरूपती बालाजी अवतार देखावा adjust डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट चॅरिटेबल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल’ने सन्मान adjust१६०० मतांचा फरक ८२४ पेक्षा निश्चितच मोठा - अमल महाडिक adjust दि एज्युकेशन सोसायटीचे अनिधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश adjustयांना मिळाला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक शिक्षिका पुरस्कार
schedule31 Dec 22 person by visibility 131 categoryशैक्षणिकशैक्षणिक
कसबा बावडा/वार्ताहर
तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या एमबीएच्या ६ विद्यार्थ्यांची ‘पीनक्लिक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीमध्ये निवड झाली. गतवर्षी सुरु झालेल्या या विद्यापीठामधील सर्वप्रथम प्लेसमेंट मिळवण्याचा मान या विद्यार्थ्यांना मिळाला आहे.

‘पीनक्लिक प्रायव्हेट लिमिटेड’ ही रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून कंपनीकडू मालमत्तेची खरेदी आणि भाड्याने घरे उपलब्ध करून देण्याची सेवा पुरवली जाते. या कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. या ड्राईव्हमध्ये स्कूल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये निखील पाटील, विशाल भोसले, सिद्धांत बिरनाळे, प्रकाश होडगे, ओमकार शिंदे, सुयश पाटील या विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना कंपनीने प्रॉपर्टी अॅडव्हायझर या पदावर वार्षिक ५ लाख १६ हजार वेतनावर जॉब ऑफर दिली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. अनिल गायकवाड यांनी दिली.
  
याबाबत अधिक माहिती देताना कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले, दीड वर्षापूर्वी सुरु झालेल्या या विद्यापीठाच्या ६ विद्यार्थ्यांची ‘पीनक्लिक प्रायव्हेट लिमिटेड’सारख्या नामांकित कंपनीमध्ये झालेली निवड अभिनंदनीय आहे. विद्यापीठात झालेला हा पहिलाच प्लेसमेंट ड्राईव्ह असून अन्य कंपन्याचेही ड्राईव्ह आयोजित केले जात आहेत. आधुनिक शिक्षण, विविध स्किल्स व प्रशिक्षण यासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जात आहे. त्याचा चांगला फायदा या विद्यार्थ्यांना झाला. आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना उत्तम नोकरीची संधी मिळावी यासाठी आमचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कुलगुरु डॉ. के. प्रथापन यानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, अधिष्ठाता डॉ. मुरली भूपती, डॉ अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी अभिनंदन केले आहे.