Awaj India
Register
Breaking : bolt
*विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित; आमदार ऋतुराज पाटीलधनंजय महाडिक यांच्या पुत्र प्रेमामुळे सत्यजित कदम शिवसेनेतआमदार सतेज पाटील काँग्रेसचे स्टार प्रचारकगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजन उत्‍साहातकाँग्रेसने निष्ठावंतांना उमेदवारी का दिली नाही ; राजेश क्षीरसागरसत्यजित कदम, कृष्णराज महाडिक करणार राजेश क्षीरसागर यांचा प्रचारअमल महाडिक यांच्यानंतर दोन महाडिक बंधूंची उमेदवारीसाठी तयारी...तर राजेश क्षीरसागरांचा प्रचारक मी असेन; धनंजय महाडिकगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटीलगतवेळपेक्षा जास्त मतदान घेत विधानसभा जिंकणार; ऋतुराज पाटील

*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट*

schedule13 May 24 person by visibility 213 category

कोल्हापूर ;

डी. वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी बेंगळूर येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोला भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रो व त्या सबंधित संस्थांमधील संशोधकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली.

इस्रो आऊटरिच प्रोग्रॅम या अंतर्गत भारतीय अवकाश (अंतरीक्ष ) संशोधन संस्थेशी संलग्न यु.आर. राव सॅटेलाईट सेंटर येथे विद्यार्थ्यांना विविध उपग्रह व त्यांचे प्रक्षेपण याबाबत माहिती देण्यात आली. यामध्ये आर्यभटट, मास ऑरबिटल मिशन, चांद्रयान मोहीम 1,2,3 याबाबतच्या प्रतिकृती पाहता आल्या. चांद्रयान -3 मोहिमेचा उद्देश, मोहिमेदरम्यान संशोधकांना आलेल्या विविध अडचणी, तांत्रिक बारकावे याबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर उपग्रह निर्मिती व त्याची चाचणी केल्या जाणाऱ्या केंद्राला विद्यार्थ्यांनी भेट दिली. इलेक्ट्रो- ऑप्टिक्स सिस्टीम्स् प्रयोगशाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांनी अनुभवी संशोधकांशी संवाद साधला. स्पेस अॅप्लीकेशनसाठी प्रगत ऑप्टिकल सिस्टीम आणि सेन्सरचा विकास आणि उत्पादनासाठी या ठिकाणी काम चालते. 

इस्रोच्या या भेटीमुळे अवकाश संशोधन क्षेत्रात सुरु असलेले कार्य व देशाने या क्षेत्रात घेतल्या मोठ्या भरारीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. अभियांत्रिकी व संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यानी संशोधन आणि विकास क्षेत्रात काम करून देशाच्या प्रगतीमध्ये मोठे योगदान द्यावे असे आवाहन यावेळी संशोधकांनी केले. 

इस्रोच्या या भेटीनंतर विद्यार्थ्यांनी संस्थचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांची भेट घेऊन तेथे घेतलेल्या अविस्मरणीय अनुभव कथन केले. तसेच या भेटीसाठी अनुमती व प्रोत्साहन दिल्याबद्दल डॉ. पाटील यांचे आभार मानले.

या अभ्यास दौऱ्यासाठी विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते-पाटील,प्रा. प्रांजल फराकटे, प्रा. रोहिणी गायकवाड यांनी नियोजन केले. विद्यार्थी प्रतिनिधी सुजल गावडे, तेजसिंह हराळे- भोसले, श्रेया साळुंखे व अंजली तगरकर यांनीविशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, विभागप्रमुख डॉ. तानाजीराव मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes