यशवंतराव चव्हाण(के.एम.सी.) काॅलेज, कोल्हापूर भूगोल विभागाच्या वतीने "काॅसमाॅस" भित्तीपत्रक "आपत्ती व्यवस्थापन" या विषयावर 5 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन काॅलेजचे प्राचार्य डॉ. बी .एन उलपे यांच्या हस्ते करण्यात करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.आपत्ती व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना दिले पाहिजे असे मत प्राचार्य उलपे सरांनी व्यक्त केले व पोस्टर बनविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक ही केले. काॅलेजमधील भूगोल विभाग उपक्रमशील आहे असे ही मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख डॉ. जे. एम. शिवणकर यांनी केले व काॅसमाॅस भित्तीपत्रकाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात शिक्षक दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागातील प्रा. डॉ.युवराज मोटे यांचा कृती फौंडेशन, कोल्हापूर "शिक्षण हक्क परिषद 2024" मध्ये दिला जाणारा क्रांतिबा जोतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार-2024 जाहीर झाल्या बद्दल भूगोल विभागाकडून सत्कार करण्यात आला. पोस्टर बनविण्यासाठी भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष झित्रे यांनी केले व तर आभार विद्यार्थिनी कु.नयन लोखंडे हिने मानले.यावेळी कार्यक्रमात डॉ. ए.व्ही पौडमल, डॉ बी. एम.पाटील.प्रा. सचिन धुर्वे, प्रा. ए.डी. मुडे, प्रा. किरण भोसले, डॉ. पी.पी. नागावकर, प्रा. एस. पी. कांबळे, ग्रंथपाल आर. आर. मांगले तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.