Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण प्रेरणा पुरस्काराने सचिन कदम यांचा गौरव*डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथे नोकरी मेळाव्यात ११८ उमेदवारांची प्राथमिक निवड*कोल्हापूर मंडळात ६,५९२ बूथवर ६.२२ लाखांहून अधिक बालकांना पोलिओ डोसपुण्यसृष्टी प्रकल्प : अतिक्रमण काढण्याचे आदेश *डी. वाय. पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरतर्फे* *आजपासून दोन दिवसीय ‘आर्किटेक्चर बूट कॅम्प*

जाहिरात

 

डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न

schedule13 Jan 25 person by visibility 575 categoryशैक्षणिक

कसबा बावडा येथील डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बजाज ऑटो लिमिटेड ,पुणे कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न झाले.

या कॅम्पस इंटरव्यूमध्ये डी वाय पाटील पॉलिटेक्निक बरोबरच आयसीआरई गारगोटी , डॉ.बापूजी साळुंखे पॉलिटेक्निक तसेच  ए.डी .शिंदे पॉलिटेक्निक गडहिंग्लज येथील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते. 

यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या कॅम्पस ड्राईव्ह मधून  27 विद्यार्थ्यांची कंपनीच्या वतीने निवड करण्यात आली.

यावेळी सी. एस. कोरे यांनी बजाज कंपनी बद्दल माहिती दिली . तसेच विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.

  प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, बजाज कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. चांगले टेक्निकल ज्ञान,सॉफ्ट स्किल्स आणि आत्मविश्वास या जोरावर विद्यार्थी नक्कीच जॉब मिळवू शकतात. 

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक च्या वतीने विविध कंपन्यांच्या कॅम्पस इंटरव्यू साठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तसेच इंटरव्यू च्या तयारीसाठी  विद्यार्थ्यांना ट्रेनिंग सुद्धा दिल्याचे डॉ.नरके यांनी सांगितले.

 यावेळी निवड झालेल्या 27 विद्यार्थ्यांना जॉब ऑफर लेटर सुद्धा देण्यात आली. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.अजय बंगडे , प्रा.अर्जुन पाटील, प्रा. गौरी कदम ,
प्रा. संदीप पाटील यांनी नियोजन केले. 

यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, रजिस्ट्रार  महेश रेणके डॉ.पी.के.शिंदे, प्रा.एस.बी.शिंदे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes