डॉ. कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीर
schedule04 Jan 25 person by visibility 149 categoryशैक्षणिक
कोल्हापूर
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या आजी -माजी विद्यार्थी संघटना शिवाजी विद्यापीठाचे डॉ. प्रवीण कोडोलीकर यांना धम्मविचार साहित्याने धम्मविचार साहित्य गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. तरुण साहित्यिक आणि राज्याचे प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक डॉक्टर अमर कांबळे यांनी या पुरस्काराची निवड केली आहे.
गेले सात वर्ष समाज हिताचे, सामाजिक न्यायाच्या लोकशाहीवादी मूल्यांची रुजवणूक करणारी मानवतावादी, समतावादी, माणूस केंद्री अशा स्वरुपाचे विचार मांडणारे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन भरवले जाते. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येतो.
यावर्षी ५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी सातवे धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलन सपन्न होत आहे.
डॉक्टर कोडोलीकर यांनी पदवीधर, उच्च पदवीधर यांच्यासह विविध प्रश्नांना न्याय देण्याचे काम केलेलं आहे. राज्य शासनाकडे प्रलंबित मागण्या संदर्भात नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून विविध प्रश्न सोडविले आहेत. यासह सामाजिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केली आहे याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे अध्यक्ष एडवोकेट कमल विमल यांनी सांगितले.