कोल्हापूर : ( शिवाजी यादव )४४, वर्षाची परंपरा असलेल्या लक्ष्मीपूरी धान्य बाजार पेठेतील धान्य व्यापारी मंडळाच्या सभासदाची मिटिंग बालकल्याण संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सभेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ व्यापारी व माजी अध्यक्ष श्री सुभाष अथणे होते सभेमध्ये मंडळाच्या उत्सवकमिटी अध्यक्षपदी श्री शिवाजी बळवंत यादव व उपाध्यक्षपदी वैभव रमेश लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी राहूल हळदे खजिनदारपदी सचिन मिठारी सहसचिव पदी विशाल कोगनोळे वैभव घोडके यांची निवड करण्यात आली. नुतन सदस्य असे : ओकार पेटकर,यश मकोटे, सिद्धार्थ कापसे, श्रेयश मिठारी, सम्मेद तपकीरे, निखिल सावर्डेकर, आशिष क्षिरसागर, मयुर नष्टे, राजू निर्वाणी, आशिष हळदे या निवडी वेळी सुभाष अथणे, बलराज निकम, सागर सन्नकी, सुरेश लिंबेकर, विजय कागले, गणेश सन्नकी, राजेश आवटे, अमित खटावकर, किशोर तांदळे, धमेंद्र नष्टे यांच्यासह व्यापरी मोठ्या संख्येने उपस्थित होते