शाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन
schedule08 May 24 person by visibility 209 categoryसामाजिक
आवाज इंडिया
मुंबई येथील त्यांच्या निधनस्थळी (पन्हाळा लॉज राजवाडा, खेतवाडी, गल्ली नंबर 13) या जागेवर 2022 साली उभारण्यात आलेल्या शाहू स्मृतीस्तंभास सर्व शाहूप्रेमींच्या साक्षीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण,महिला व बाल विकास मंत्री श्री मंगल प्रभात लोढा साहेबांनी श्री शाहू स्मृतिस्तंभ सुरक्षा दृष्टीने परिपूर्ण केल्याबद्दल त्यांना शाहू महाराज यांची फोटो बायोग्राफी भेट दिली तसेच सत्कार केला.
यावेळी स्मृति स्तंभाला अभिवादन करण्यासाठी
मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रवी सरदेसाई साहेब, राजश्री शाहू मालिकेचे दिग्दर्शक श्री सतीश रणदिवे सर ,श्री शाहू स्मृतीस्तंभ सदस्य पैलवान संग्राम कांबळे,D.B. मार्ग पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.विनय घोरपडे साहेब,बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रावसाहेब सांगोलकर साहेब ,
मुंबई पोलीस सागर पट्टणकुडी ,विनायक गाजरे, रोहित महाडिक, शिवसेना शाखाप्रमुख शशिकांत पवार, प्रज्ञा जाधव मॅडम, बीजेपी संघटक अजय मिश्रा,मुंबई पोलीस दलातील अधिकारी,कर्मचारी व प्रशासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी शेवटचा श्वास ज्या ठिकाणी घेतला त्या पन्हाळा लॉज या राजवाड्याच्या ठिकाणी आम्ही त्यांच्या स्मृती जतन करू शकलो,आमच्या जीवनाचे सार्थक झालं.
*लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..*🙏💐🚩
#शाहूस्मृतीस्तंभ
धन्यवाद.🙏💐
पैलवान संग्राम कांबळे.✨