Awaj India
Register
Breaking : bolt
पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांना* *स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग*हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*

जाहिरात

 

पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

schedule25 Apr 26 person by visibility 16 categoryराजकीय

कोल्हापूर (प्रतिनिधी) – गंगावेश परिसरात महापालिकेच्या ढिसाळ आणि बेफिकीर कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून, पाईपलाईन गळतीमुळे प्रकाश बापू शिंदे यांच्या घराच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
सदर गळतीमुळे बेसमेंटमध्ये दिवसेंदिवस पाण्याची पातळी वाढत असून, घरातील साहित्याचे मोठे नुकसान होत आहे. साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी कुटुंबीयांना घरात राहणेही अवघड झाले आहे.
“महापालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही अधिकारी केवळ पाहणीचा दिखावा करतात; प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. नागरिकांच्या समस्यांकडे इतके दुर्लक्ष करणे ही संतापजनक बाब आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला असून, तात्काळ गळती दुरुस्त करून नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रकाश बापू शिंदे यांनी दिला आहे.
 
“तत्काळ कारवाई न झाल्यास महापालिकेला जाब विचारण्यासाठी रस्त्यावर उतरू!”
दरम्यान, या प्रकारामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes