Awaj India
Register
Breaking : bolt
पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;सरकारी सेवेत असतानाच खासगी नोकरी; डॉ. अमित पाटील यांच्याविरोधात बडतर्फीचा प्रस्तावमधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी ४ मे पूर्वी नामांकने सादर करावीत* आत्महत्या रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये 'समुपदेशक' नेमाविद्यार्थ्यां साठी मोफत शिक्षण डी. वाय. पाटीलच्या विद्यार्थ्यांना* *स्टार्टअपसाठी 50 हजारचे सीड फंडिंग*हनुमान पतसंस्थेची भरारी; १.८५ कोटींचा ढोबळ नफा- चेअरमन बळवंत पाटील मास्तरआरोग्य विज्ञान क्षेत्राला अधिकाधिक संशोधनाची गरज - ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन*

जाहिरात

 

अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;

schedule25 Apr 26 person by visibility 23 category

कोल्हापूर:
सोशल मीडियाचा वापर करून सर्वसामान्य तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून लुटणारी एक मोठी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. अनाथ मुलींशी लग्न लावून देण्याच्या नावाखाली रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका तरुणाची हजारो रुपयांना फसवणूक झाल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील करंजडी येथील सुरज सोपान सुतार या तरुणाला फेसबुकवर 'शिवराज्य ९६ कुळी मराठा' नावाच्या ग्रुपवर एक जाहिरात दिसली होती. या जाहिरातीत 'अनाथ मुलींचे लग्न लावून दिले जाईल' असे नमूद करण्यात आले होते. या जाहिरातीला प्रतिसाद देत सुरज यांनी संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला.
अशी झाली फसवणूक:
संबंधित व्यक्तींनी सुरुवातीला फॉर्म फी म्हणून ६,५०० रुपये उकळले. त्यानंतर त्यांना दोन मुलींचे फोटो पाठवून 'मुलींना तुमचा मुलगा पसंत आहे' असे सांगून विश्वास संपादन केला. पुढे अनाथ आश्रमात प्रवेश करण्यासाठी 'गेट पास'च्या नावाखाली पुन्हा ७,००० रुपये भरण्यास भाग पाडले. लग्नाची तारीख १० एप्रिल ठरवण्यात आली होती, मात्र ती पुढे ढकलून २५ एप्रिल करण्यात आली.
कोल्हापुरात आल्यावर फुटले भांडे:
ठरल्याप्रमाणे लग्नासाठी पुंडलिक सुतार कोल्हापुरात दाखल झाले. मात्र, येथे आल्यावर ज्या व्यक्तींशी संपर्क होत होता, त्यांनी फोन उचलणे बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुतार यांनी कोल्हापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.
"आमच्यासोबत जे झाले ते इतर कोणत्याही गरीब मुलासोबत होऊ नये, यासाठी आम्ही पोलिसांत तक्रार करत आहोत. सोशल मीडियावरील अशा जाहिरातींना कोणीही बळी पडू नका," असे आवाहन पीडित तरुण सुरज सुतार यांनी केले आहे.
 
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes