कर्तृत्वान शिक्षक – सुकेश विलासराव पाटील
schedule26 Nov 25 person by visibility 9 categoryशैक्षणिक
कर्तृत्वान शिक्षक – सुकेश विलासराव पाटील
विद्या मंदिर, चौगलेवाडी (प.नि.), ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर
शाहूवाडी तालुक्यातील डोंगरदऱ्यात, जंगल परिसरातील छोटेखानी विद्या मंदिर चौगलेवाडी ही शाळा आज जिल्ह्यात ओळख निर्माण करत आहे. आणि या यशामागे उभे आहेत—अध्यापक सुकेश विलासराव पाटील.
२५ फेब्रुवारी २००५ रोजी सेवेत रुजू झालेल्या पाटील सरांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, स्पर्धा परीक्षा, पालक सहभाग आणि लोकसहभाग यांची उत्तम सांगड घालत ग्रामीण भागातील शाळेला नावलौकिक मिळवून दिला आहे.
🌈 शाळेची भव्य कामगिरी – पाटील सरांच्या नेतृत्वात
- ‘माझा वर्ग माझा अभिमान’ स्पर्धेत इयत्ता पहिली — तालुक्यात प्रथम क्रमांक 🏆
- निपुण भारत वाचन-लेखन मोहिमेत – तालुक्यात प्रथम, जिल्हा निवड 🏆
- तालुकास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत भव्य यश
- नाट्यिकरण – प्रथम क्रमांक 🏆
- समूह नृत्य – प्रथम क्रमांक 🏆
- समूहगीत – द्वितीय क्रमांक 🏆
- शाळा – तालुका चॅम्पियन
- महिला लेझीम पथक – माता-पालक सहभागातून घडवलेला उपक्रम जिल्ह्यापर्यंत दाखल 🏆
- शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) – विद्यार्थी उत्तीर्ण 🏆
- प्रज्ञाशोध परीक्षा (इ. ४ थी) – सलग दोन वर्ष तालुक्यात चमक 🏆
- अंकुर स्पर्धा परीक्षा
- इ. १ ली – एक विद्यार्थिनीचे १००/१०० गुण
- दोन विद्यार्थी – ९६ गुण, एक विद्यार्थी – ९४ गुण 🏆
- डिजिटल स्नेहसंमेलन – जवळपास ₹२ लाखांचे बक्षीस व उठाव 🏆
🏫 लोकसहभागातून बदललेली शाळेची ओळख
पाटील सरांनी समाजाची ताकद ओळखत शाळेला भक्कम आधार मिळवून दिला —
- दोन संगणक, ५ कपाटे, २ संगणक टेबल, साउंड सिस्टम, ५ डिजिटल फ्रेम
- एका वर्गावर पत्रा बसवून घेणे (शिक्षण विभाग)
- ग्रामपंचायत वित्त आयोगातून स्वच्छतागृह बांधणी
- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – सलग दोन वर्ष **केंद्रात प्रथम क्रमांक