Awaj India
Register
Breaking : bolt
फुले–शाहू–आंबेडकर फोरमतर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व सत्कार समारंभएस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध

जाहिरात

 

फुले–शाहू–आंबेडकर फोरमतर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून व्याख्यान व सत्कार समारंभ

schedule25 Nov 25 person by visibility 19 categoryशैक्षणिक


कोल्हापूर | 

भारताला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या महान संविधानाला यंदा ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने देशभरात “भारतीय संविधान सन्मान दिवस” उत्साहात साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर फुले–शाहू–आंबेडकर फोरम, कोल्हापूर यांच्या वतीने  २६ नोव्हेंबर २०२५ रोजी विशेष व्याख्यान व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

संविधानाने भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक गणराज्याचा दर्जा दिला असून मानवमुक्ती, समता, स्वातंत्र्य व न्याय यांच्या मूल्यांना अधोरेखित करणारी ही जगातील सर्वात प्रगत सनद मानली जाते. ७५ वर्षांच्या प्रवासानंतर संविधानाचे रक्षण, जागृती व प्रभावी अंमलबजावणी यांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत असल्याचे फोरमतर्फे सांगण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. विजय काळेबाग (भोगावती महाविद्यालय, कुरुकली) हे “संविधानाचे रक्षण: जागृती आणि कृती कार्यक्रम” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे समारंभाध्यक्ष प्रा. डॉ. हरीष भालेराव (अध्यक्ष – फुले शाहू आंबेडकर फोरम, कोल्हापूर) असतील.
तसेच प्रा. डॉ. पी. एस. कांबळे (अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ) यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

📅 दिनांक : बुधवार, २६ नोव्हेंबर २०२५
⏰ वेळ : सायं. ५:३० वाजता
📍 स्थळ : फुले–शाहू–आंबेडकर फोरम सभागृह, मनीषा नगर, कोल्हापूर
📞 संपर्क : ९४२०३५१५१८

स्थानिक व्यवस्थापन समिती, सचिव आयु. प्रा. ए. बी. कांबळे, उपाध्यक्ष आयु. प्रा. डॉ. पी. एस. कांबळे व अध्यक्ष प्राचार्य डॉ. हरीष भालेराव यांनी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes