Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची* *तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड*गोकुळ दूध वितरक कमिशन वाढीच्या निर्णयाला विरोध;गांधीनगरात सिंधी समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर*सहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही गोकुळच्या मतदानास पात्रकोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;उपवर्गीकरण ला विरोधच: डॉक्टर राजेंद्र गवई यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे

जाहिरात

 

ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*

schedule29 Oct 25 person by visibility 591 categoryशैक्षणिक

 

कोल्हापूर –

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकानी उर्जा संचयासाठी संशोधित केलेल्या नव्या सिलार रासायनिक पद्धतीसाठी भारत सरकारकडून पेटंट जाहीर झाले आहे. 

 

संशोधन विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोरस रिड्यूस्ड ग्राफीन ऑक्साइड /रुधेनियम ऑक्साइड कोटींग फॉर एनर्जी स्टोरेज अ‍ॅप्लिकेशन’ या विषयावर हे संशोधन करण्यात आले.  पुढील २० वर्षांसाठी मिळाला असून, या संशोधनामुळे शास्त्रज्ञांना ऊर्जा संचयासाठी नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे. 

  

ही नवीन प्रक्रिया ऊर्जा साठवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सुपरकॅपेसिटर आणि बॅटरीसाठी प्रभावी आणि कार्यक्षम 'थिन फिल्म्स' विकसित करण्यासाठी वापरली जाईल. ही पद्धत सिलार रासायनिक प्रक्रियेद्वारे विकसित करण्यात आली असून, ती तुलनेने अधिक सोपी आणि कमी खर्चिक आहे. उर्जा क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. 

या संशोधन कार्यात मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. अजिंक्य बगडे, डॉ. दिव्या पवार,  ज्योती थोरात आणि डॉ. अभिषेक लोखंडे यांचा सहभाग होता.

 

या संशोधनासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, रिसर्च डायरेक्टर प्रा. डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes