बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध
schedule27 Aug 25 person by visibility 181 categoryराजकीय
केनवडे: युवराज राजीगरे-चुयेकर
बेलवळे खुर्द ता कागल येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंडलिक गटाच्या सौ.अनिता मारूती पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक राजेश्री सुर्यवंशी होत्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून केनवडे सर्कल प्रदीप कोरवी यांनी काम पाहिले.
यावेळी गटनेते हमिदवाडा चे संचालक नेताजी पाटील,राजे गटाचे मारुती पाटील ,के.पी.पाटील,शिवसेना तालुका प्रमुख अशोकराव पाटील,बाबा गटाचे ज्ञानदेव जाधव,संभाजी पाटील ,सदस्य अशोक पाटील मा. सरपंच छाया जाधव, उपसंरपच दिपाली पाटील ,धनाजी कांबळे ,महादजी पाटील ग्रामस्थ उपस्थित होते