Awaj India
Register
Breaking : bolt
एस. पी. दिक्षित यांना ‘महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार’ सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने प्राध्यापिका सौ. सुमन अक्षय कांबळे सन्मानित डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती

जाहिरात

 

डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*

schedule31 Aug 25 person by visibility 323 categoryराजकीय

कोल्हापूर :
 कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या "हिरकणी मंच" तर्फे गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थिनींसाठी गौरी गीते स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धांचा बक्षीस समारंभ सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ.महादेव नरके यांच्या उपस्थितीत झाला. रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला.
 
 यामध्ये झिम्मा, सूप नाचवणे,घागर नाचवणे, फुगडी, काटवट कणा ,पायातील घोडा, छूई -फुई या स्पर्धांचा समावेश होता.२५० हून अधिक विद्यार्थिनींनी आपले कौशल्य दाखवत अत्यंत उत्साहाने या स्पर्धामध्ये सहभाग घेतला.
झिम्मा स्पर्धेत हरसखी, जिजाऊ तारा,राजमुद्रा या संघानी बक्षिसे मिळवली.
 
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.नरके यांनी पॉलिटेक्निकमधील हिरकणी मंचतर्फे आपली संस्कृती टिकावी आणि विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जात असल्याचे नमूद केले.
 
यावेळी श्रीराम संस्था माजी उपसभापती सौ. प्रिया पाटील, परीक्षक सुलोचना बागडी, हिरकणी मंच समन्वयक प्रा.नीलम रणदिवे, प्रा. शीतल साळोखे, प्रा.ऐश्वर्या पाटील, प्रा.एस.बी.शिंदे, प्रा.नेहा माने, प्रा.वैष्णवी पाटी तसेच ,माजी विद्यार्थी धनराज वाडकर यांच्यासह हिरकणी मंचमधील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes