कुरुंदवाड आगारात नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू प्रवीणभाई माणगावे यांच्या मागणीला यश
schedule25 May 25 person by visibility 26 categoryराजकीय


शिरोळ :
शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना एसटी फेऱ्या नसल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. याकरिता कुरुंदवाड आगारात नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी रुजू झाल्या आहेत. जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांच्या मागणीला यश आले आहे.
ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या आगारातील एसटी बसेसच्या कमतरतेमुळे बंद करण्यात आल्या होत्या. तर आगारातील जुन्या एसटी बसेस अन्य आगारात पाठवण्यात आल्या होत्या. यामुळे एसटी अभावी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. एसटीची तासंतास वाट पाहत ताटकळत बसावे लागत होते. यामुळे कुरुंदवाड आकारामध्ये एसटी बसेसची संख्या वाढवावी. कुरुंदवाड आगाराच्या मालकीची असणाऱ्या एसटी बसेस परत आगारात द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी केली होती. या संदर्भात त्यांनी मुंबई मंत्रालयात परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेऊन कुरुंदवाड आगारातील अनेक समस्यांचा पाढाच त्यांच्यासमोर मांडला. या बैठकीदरम्यान परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कुरुंदवाड आगाराला या महिन्याअखेर नवीन बसेस देण्यात येतील. तसेच अन्यत्र असणाऱ्या जुन्या एसटी बसेस पुन्हा कुरुंदवाड आगाराच्या ताब्यात देण्यात येतील असे आश्वासन दिले होते.
परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कुरुंदवाड आगारात नवीन एसटी बसेस दाखल झाल्या आहेत. आलेल्या एसटी बसेसचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी जनता दल सेक्युलर पक्षाचे राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे, नियोजन मंडळाचे सदस्य प्रा चंद्रकांत मोरे, जि प चे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर मादनाईक आण्णासाहेब मगदूम, माजी नगरसेवक दीपक गायकवाड, नृसिंहवाडीचे नेते अभिजीत जगदाळे, अजय भोसले, संजय शिंदे, यांच्यासह आगार व्यवस्थापक आणि कर्मचारी उपस्थित होते.