+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule14 Jul 20 person by visibility 1132 categoryसंपादकीय
महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाचे भौगोलिक विश्लेषण: भौगोलिक घटकाचा मानवी जीवनावर व आरोग्यावर ही परिणाम पडतो यामध्ये प्रामुख्याने, भूरचना, हवामान, लोकसंख्या व घनता, वसाहती, आहार, संस्कृती इत्यादी घटक महत्वाचे आहेत. सध्या जगभरात कोरोना विषाणूचा थैमान सुरु आहे त्याच्या प्रसारावर ही काही भौगोलिक घटक परिणाम करतात असे दिसून येत आहे. भौगोलिक घटकातील भूरचना महत्वाचा घटक आहे त्याचा परिणाम मानवीजीवनावर आहे. भूरचनेमध्ये, पर्वत, पठारे व मैदाने यांचा समावेश होतो व त्यानुसार लोकसंख्येच केद्रीकरण झालेल पहावयास मिळते. मुळात पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या व घनता कमी, तिथे घराची रचना दूर दूर, जंगलांचे प्रमाण जास्त, प्रसार कमी जगभरात तशीच स्थिती आहे, पण पर्वतीय प्रदेशात सुध्दा स्थलांतर करुन लोकांच्या स्थलांतरामुळे कोरोनाचा प्रसार झाला आहे. पठारी प्रदेशात लोकसंख्या आहे काही प्रमाणात आहे तिथे ही कोरोना प्रसार होत आहे आणी मैदानी प्रदेशामध्ये दाट लोकवस्ती, घनता ही जास्त, शहरणीकरणाचे प्रमाण जास्त, कोरोना प्रसाराचा वेग ही त्या प्रदेशात जास्त. हवामानाचा मानवी जनजीवनावर परिणाम होत आहे, उन्हाळा, हिवाळा व पावसाळा ऋतुमान आरोग्यावर परिणाम करतात, उष्ण हवामान आहे कोरोना प्रसार होणार नाही अस म्हटल जात होत पण त्यात तथ्थ दिसले नाही उष्ण हवामानाच्या प्रदेशात कोरोनाचा प्रसार झालेला आहेच. मुळात हिवाळ्यात चीन मधील वुहान प्रांतामधून या रोगाचा प्रसार झाला त्यामुळे हिवाळा ऋतु धोकादायकच ठरला कोरोना प्रसाराबाबत, भारतात सध्या उन्हाळा संपलेला असून पाऊसाळा ऋतुचे आगमन होत आहे पण कोरोनाचा प्रसार हा होतच आहे. पावसाळ्यात कोरोना प्रभाव कमी होईल की वाढेल याचा अंदाज नाही व त्यावर संशोधन ही जास्त कुठे दिसत नाही त्यामुळे पावसाळ्यात वेग मंदावतो का वाढतो त्याचे निष्कर्ष आत्ताच बांधणे कठीण आहे पण मानवी आरोग्यावर पावसाळा ऋतुचा परिणाम होतो हे मात्र खर आहे. लोकसंख्या व घनता यांचा परिणाम आहे कोरोना प्रसारावर आहे. जगभरात जास्त लोकसंख्येची घनता आहे त्या शहरात प्रसार कोरोनाचा जास्त आहे राज्यातील मुबंई, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, देशातील दिल्ली, जगभरातील जास्त लोकसंख्या घनतेची शहरे त्यामुळे शहरी भागात कोरोना प्रसार जास्त. वसाहतीचा परिणाम ग्रामीण भागात घरे दूर अंतरावर, शहरी भागात घरांची दाटी, कोरोना रुग्नाचा प्रसार आहे. आहार हा घटक आरोग्यासाठी महत्वाचा आहे चांगला सात्विक आहार असेल तर आरोग्य चांगल राहत रोगप्रतिकार शक्ती वाढते शरीर कोणत्याही आजाराचा सामना करतय म्हणून पौष्टीक आहार आरोग्यासाठी महत्वाचा आहे. प्रत्येक भौगोलिक प्रदेशाची आहाराची वैशिष्टये आहेत महाराष्ट्र राज्याचा विचार करता कोकणातील आहार पध्दती वेगळी आहे भात , मासे यांचा आहारात समावेश, पौष्टीक जीवनसत्वे मिळतात लोकल आहारामुळे, पश्चिम महाराष्ट्राची पण आहार शैली मध्ये ज्वारी, बाजरी व इतर भाजीपाला यांचा ही समावेश , खानदेश, विर्दभ व मराठवाड्यात त्या त्या प्रदेशातील पध्दतीने आहार त्यामुळे शरीराची जडणघडण ही तशीच होते. परंतु शहरी भागात आहारशैलीत बदल झालेलाआहे, फास्ट फुड चा समावेश त्याचे परिणाम आरोग्यावर त्यामुळे आहार आरोग्याच्या अनुशंगाने महत्वाचा आहे. संस्कृती घटक महत्त्वाचा आहे विदेशात हातात हात मिळवतात, अलिंगण दिले जाते त्यामुळे कोरोना प्रसार जास्त याउलट भारतीय संस्कृतीमध्ये नमस्कार केला जातो कोरोना प्रसार कमी म्हणून संस्कृती हा घटक पण महत्त्वाचा आहे. हे सगळे वरील घटक परिणाम करतात भारतात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे जास्त रुग्ण वाढत आहेत. राज्यात चौथ्या लॉकडाऊन मध्ये रुग्नाच्या संख्येमध्ये आणखीनच भर पडल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. एकंदरीतच राज्याच्या भौगोलिक जडणघडणीचा विचार करता राज्याची प्राकृतिक रचना भिन्न स्वरूपाची आहे. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाट, महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठार प्रदेश अश्या स्वरूपाची आहे. प्राकृतिक रचनेचा लोकसंख्येवर व तिथल्या विकासावर परिणाम झालेला आहे. शेतीव्यवसाय, उद्योगधंदे, व्यापार,रोजगार या वर ही प्राकृतिक रचनेचा प्रभाव पडतो ज्या भागात प्राकृतिक घटक अनुकूल आहेत त्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असलेले आढळते. महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद,नागपूर, सोलापूर या शहरामध्ये लोकसंख्येच केंद्रीकरण जास्त आहे तिथे लोकसंख्या व लोकसंख्येची घनता जास्त आहे त्याच भागात कोरोनाचा फैलाव जास्त आहे असे दिसते त्यामुळे शहरीकरण या भौगोलिक घटकाचा परिणाम कोरोना विषाणू फसरण्यास मदत करतो शहरात घरांची गर्दी, लोकसंख्येच दाट प्रमाण, झोपडपट्ट्यांची संख्या, सार्वजनिक शौचालयांचा वापर, सोशल डिस्टन्सिंग चा अभाव व नियमाचे पालन होत नाही, आरोग्याच्या बाबतीत साक्षरतेचा अभाव, त्यामुळे कोरोना प्रसार जास्त आहे. शहरामध्ये कोरोना जास्त असलेमुळे लोक शहरी भागातून ग्रामीण भागामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत आहे या स्थंलांतराबरोबरच या रोगाचा प्रसार ही होत आहे असच दिसते. सुरुवातीला मर्यादित क्षेत्रांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होता तो मात्र आता राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये पोहचलेला आहे व राज्यामध्ये विविध कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण होत असलेले दिसून येत आहे विशेष म्हणजे शहरी भागाबरोबरच ग्रामीणभागात सुध्दा प्रसार वाढत आहे मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे हॉटस्पॉट निर्माण होत आहेत. प्रशासकीय पातळीवर महाराष्ट्राचे जे विभाग आहेत त्या विभागातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेणे महत्वाचे आहे जेणे करून त्या विभागामधील, गाव, तालुके, जिल्हे येथील कोरोना प्रसार रोखण्यास मदत होईल राज्यातील प्रत्येक विभागाची वैशिष्टये वेगवेगळी आहे. महाराष्ट्राच्या जडण घडणीचा विचार करता भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक व सांस्कृतिक घटक हे महत्वाचे आहे. राज्याचे भौगोलिक दृष्टीने कोकण विभाग, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भ असे विभाग आहेत पण प्रशासकीय विभागाचा विचार करता राज्यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर असे सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यामुळे कोणत्या प्रशासकीय विभागात संख्या जास्त आहे किंवा कोणत्या विभागात कमी आहे हे पाहणे गरजेचे आहे कारण आता कोरोना रोखण्यासाठी गावपातळीपासून, तालुका, जिल्हा व राज्यपातळी पर्यत काम करणे गरजेचे बनले आहे प्रत्येक गावाचा, तालुक्याचा, जिल्हाचा आढावा घेणे गरजेचे आहे तस केल तरच आपण कोरोनाचा सामना करू शकतो. राज्यामध्ये प्रामुख्याने कोरोना रुग्णाच्या पहिल्या दहा मध्ये मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, रायगड, नाशिक, जळगाव, सोलापूर व नागपूर यांचा समावेश आहे. तर सगळ्यात कमी रूग्न असले खालून दहा जिल्हे या मध्ये वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, वाशिम,परभणी, बीड, गोदिंया, नंदुरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद या जिल्हांचा समावेश आहे. त्यामुळे या जिल्हावर ही लक्ष देऊन प्रसार रोखला तर आपण कोरोनावर नियत्रण मिळवू शकतो. राज्याच्या प्रशासकीय विभागानुसार कोरोना रूग्नाची संख्या पाहता कोकण प्रशासकीय विभागामध्ये सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्न असलेले आढळले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई सबअर्बन, ठाणे, पालगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो मुंबई हे प्रशासकीय ठिकाण असून ते आपल्या देशाची आर्थिक राजधानी असल्याने लोकसंख्या व तिची घनता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याच बरोबर अशिया खंडातील नंबर दोन क्रमांकाची धारावी झोपडपट्टी मुंबई मध्येच आहे तिथेही लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे या भागामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणूनच मुंबई येथून लोकसंख्येचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे लोकांच्या स्थलांतराबरोबरच कोरोना चा प्रसार ही शहरी भागातून ग्रामीण भागाकडे होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ही कोरोना प्रसारामुळे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबई मध्येच 85, 724 रूग्न आहेत तर याच विभागात सगळ्यात कमी सिंधुदुर्ग जिल्हात सगळ्यात कमी रूग्न आहेत.कोकण विभागास लागून असणारा पुणे प्रशासकीय विभागाचा दुसरा क्रमांक आहे. या विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर व अहमदनगर या जिल्हायांचा समावेश आहे. पुणे जिल्हात सगळ्यात जास्त रुग्न आहेत म्हणून हा जिल्हा कोरोना हॉटस्पॉट आहे, या विभागातील सोलापूर व सातारा जिल्हात पण रूग्न जास्त आहेत. स्थलांतरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्हात ही रूग्न वाढत आहेत तर या विभागात अहमदनगर मध्ये प्रमाण कमी आहे. नाशिक विभागाचा राज्यात तिसरा नंबर आहे. या विभागात धुळे ,जळगाव, नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होत असून नाशिक शहर, जळगाव हे कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून गणलेले आहे.औरगाबाद विभागाचा चौथा स्थानीआहे. या विभागात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातुर, परभणी व हिंगोली या जिल्हाचा समावेश होतो या विभागातील औरंगाबाद, जालना, नांदेड व हिंगोली मध्ये जास्त रुग्ण आहेत. या विभागातील बीड मध्ये प्रमाण कमी आहे. त्यामुळे प्रत्येक विभागातील ज्या जिल्हात प्रमाण कमी आहे त्यांना कोरोणा विषाणुच्या फैलावापासून रोखल पाहिजे. अमरावती विभागाचा राज्यात पाचवा क्रमांक आहे या मध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ व वाशीम या जिल्हांचा समावेश होतो. या विभागातील अकोला, अमरावती व यवतमाळ रूग्नाचे प्रमाण जास्त आहे. राज्यामध्ये सगळ्यात कमी कोरोनाचे रुग्न नागपूर विभागामध्ये आहेत या विभागाचा सहावा क्रमांक आहे या विभागामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व वर्धा या जिल्हांचा समावेश असून या विभागातील नागपूर शहरांमध्येच कोरोनाचे रुग्ण जास्त असलेले आढळून येतात या व्यतिरिक्त या जिल्हातील इतर भागात त्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे ज्या भागात कोरोना रूग्न नाहीत तिथे खबरदारी व चांगल्या प्रकारे उपाय योजना केल्या तर तो भाग कोरोनामुक्त राहिल. राज्यातील विभागानुसार विचार करता, कोकण, पुणे, नाशिक व औरंगाबाद विभागातील 25 जिल्हामध्ये कोरोना प्रादुर्भाव जास्त असून तिथले प्रमाण कमी करणे गरजेचे बनले आहे त्यामुळे तिथे विविध उपाय योजना जास्त राबवणे गरजेचे बनले आहे. त्याच बरोबर ज्या प्रशासकीय विभागात किंवा जिल्हामध्ये रुग्नाची संख्या कमी आहे या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे तस झाल तर कमीत कमी तो विभाग किंवा त्यामधील जिल्हे, तालुके, गावे आपण कोरोना फैलावापासून वाचवू शकतो.तर आपण कोरोना विषाणूच्या फैलावापासून वाचवू शकतो इथून पुढच्या काळात प्रत्येक गावावर, तालुक्यावर, जिल्हावर बारकाईने लक्ष देऊन कोरोना व्हिलेज इन्फॉर्मेशनसिस्टम विकसित करणे आवश्यक आहे त्यामाध्यमातून प्रत्येक गावाचे रुग्न, अलगीकरण केलेले रुग्न, स्थलांतर करुन आलेले लोक, मृत्युमुखी पडलेले रूग्ण याची माहिती घेऊन काम करणे गरजेचे आहे कारण ते शक्य ही आहे प्रत्येक ग्रांमपचायत, इंटरनेट कनेक्शन ने जोडलेली आहेत त्यामुळे गावपातळी पासूनच उपाय योजना करण्यास मदत होईल, त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातूनही गावावर लक्ष ठेवता येईल, लोकांची जागरूकता खुप महत्वाची आहे, आरोग्याच्या बाबतीत, आहाराच्या बाबतीत, त्याचबरोबर जनजागृती व प्रबोधनही गाव पातळीवर होणे गरजेचे बनले आहे तसे झाले तर आपण कोरोनाचा सामना करू, सध्या तरी प्रतिबंध हाच उपाय आहे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे, गर्दीच्या ठिकाणी जाण टाळल पाहिजे, प्रशासकीय पातळीवर जे उपाय सुचविले जात आहेत त्याचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असून तर नक्की आपण कोरोना संकटावर मात करू.
डाॅ युवराज शंकर मोटे, भूगोल व पर्यावरण विभाग, बाबा नाईक महाविद्यालय , कोकरूड
मो 9923497593