+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी adjustमहायुतीचे कोल्हापुरातील तीन विधानसभा मतदारसंघ धोक्यात adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार
schedule14 Oct 24 person by visibility 65 categoryउद्योग
*..... सेस कायमस्वरूपी बंद करा या निर्णयावर ठाम*.........!!!* 🕹️
कोल्हापुर :महाराष्ट्रात विधानसभेची आचारसंहिता केव्हाही लागू शकते याच पार्श्वभूमीवरती सरकारच्या वतीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन आणि घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे 
       सन २०१७ मध्ये एक राज्य एक कर अशा स्वरूपाची जीएसटी कर प्रणाली सरकारच्या वतीने अंमलात आली.अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तू वरती जीएसटी लागू केल्याने मार्केट सेस मधुन व्यापारी वर्गाला मुक्तता मिळेल अशी आशा व्यापारी वर्गामध्ये होती.परंतु तसे न होता मार्केटसेस व जी एस टी अशा दोन्ही कराची वसुली करण्यात येत होती कर देण्यास विरोध नसुन या जाचक व अन्यायकारक करातून सूट मिळावी आणि व्यापार व्यावसायिकाच्या दृष्टिकोनातुन सुलभ व्हावा अशी व्यापाऱ्याची मापक अपेक्षा होती. त्यासाठी महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्सच्या मार्गदर्शनाखाली अनेक आंदोलने केली गेली त्यांचाच एक भाग महाराष्ट्र चेबर्स ऑफ कॉमर्स यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २७ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला होता सरकारने बंदचे गांभीर्य ओळखून व्यापाऱ्यांच्या या विषयावर चर्चा करण्यासाठी एक कमिटी स्थापन करून जाचक अटीतून मार्ग काढू असे आश्वासन व्यापारी प्रतिनिधीना दिले होते.त्यामुळे व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदला स्थगित देण्यात आली होती आपण दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज राज्यसरकार च्यावतीने फुल नाही फुलाची पाकळी देऊन व्यापारी वर्गास खुश ठेवण्याचे काम केले आहे या आदेशाचे व्यापाऱ्यानी स्वागत केले असून सेस कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार केला.

*दि कोल्हापूर ग्रेन मर्चंट असोशिएशन तर्फे निवेदन* 
*महाराष्ट्र राज्य शासनाच्या काढण्यात आलेल्या जीआर प्रमाणे मार्केट सेस हा 0.25 घ्यावा यासंदर्भात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती व कोल्हापूर जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशन चे प्रेसिडेंट संजीव परीख कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा, वैभव सावर्डेकर, विजय कागले, सुरेश लिंबेकर, विवेक शेट्टे, अमर क्षीरसागर, संतोष लाड, अतुल शहा यांच्यासह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

*अनेक मान्यवराचे अभिनंदन* 
        महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेद्र फडणविस, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री राजेश क्षिरसागर, आमदार विनय कोरे,माजी आमदार अमल महाडिक, यांच्यासह अनेकांचे अभिनंदन करण्यात आले.
 
                यावेळी विवेक शेटे, अमोल कापसे, शिवाजी मोटे, अतुल शहा, प्रविण मेळयंकी, अजित अथणे, सुनिल अस्वले, रितेश हळदे ,वैभव लाड, धन्यकुमार चव्हाण, नरेश शहा, विवेक नष्टे, अभय अथणे, प्रकाश कापसे, अमित खटावकर, सिद्धार्थ कापसे बाळासाहेब शिरहट्टी, सदलगे आण्णा धमेद्र नष्टे यांच्यासह धान्य, कडधान्य, कांदा बटाटा, गुळ, मिरची, भाजीपाला व्यापारी मोठया संख्येने उपस्थित होते