मुरगूड वार्ताहर/
मुरगूड पोलीस ठाण्यात कार्यरत राशीवडे ता. राधानगरी येथील पोलीस बाप -लेकाचा कोरोणा पाॅझिटिव्ह रिपोर्ट आल्याने ते कार्यरत असलेल्या मुरगूड पोलीस स्टेशनच्या लिंगनूर आऊटपोस्टमध्ये खळबळ उडाली. मुरगूड पोलीस ठाण्यात कार्यरत 'तो ' कर्मचारी पाॅझिटिव्ह आल्याच्या चर्चेने शहरात धक्कादायक वातावरण निर्माण झाले. सदर पोलीस कर्मचारी मुरगूड पोलीस स्टेशनअंतर्गत लिंगनूर आऊट पोस्टमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या संपर्कातील एक वरिष्ठ अधिकारी, अन्य पोलीस कर्मचारी तसेच संपर्कातील व्यक्ती अशा १६ जणांना स्वॅब तपासणीसाठी कागल येथे पाठवण्यात आले. आज तीव्र संपर्कातील चौघाचा स्वॅब घेण्यात आला. बाकीच्या कोणालाही गंभीर लक्षणे प्रथमदर्शनी आढळून न आल्याने त्यांचे संस्थात्मक विलगीकरण तसेच काहींना घरीच विलगीकरण करण्यात आले. आरोग्य विभाग या सर्वांवर विशेष लक्ष ठेवून आहे