सचिन पुन्हा क्रिकेट खेळणार...
schedule10 Sep 22 person by visibility 292 categoryक्रीडा

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कानपूर : सचिन तेंडुलकर या नावाला कोण ओळखत नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विश्वविक्रम केले आहेत. 90 चे दशक आणि त्यानंतरची अनेक वर्षे त्याने क्रिकेटचे मैदान गाजवले आहे.2013 साली सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली. त्यानंतर तो क्रिकेट खेळताना दिसला नाही. पण दोन वर्षांपूर्वी सचिन रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज टी ट्वेंटी मध्ये क्रिकेट चाहत्यांना क्रिकेट खेळताना दिसला.
आता परत एकदा चाहत्यांना सचिनला खेळताना पाहता येणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज च्या या सामन्यांमध्ये इंडिया लिजंड्स आणि जॉन टी ची दक्षिण आफ्रिका लिजंड्स एकमेकांना भिडणार आहेत. कानपूर मध्ये हा सामना आज रंगणार आहे . सचिनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघात युवराज सिंग, मुनाफ पटेल ,हरभजन सिंग इरफान पठाण, सुरेश रैना यांनाही क्रिकेट चाहत्यांना खेळताना पाहता येणार आहे.
एकूण आठ संघ सहभागी
या सीझनमध्ये भारतासह एकूण आठ संघ सहभागी झाले आहेत .यामध्ये ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड ,दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज, श्रीलंका ,बांगलादेश यांचा समावेश आहे. सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. निवृत्तीनंतर रैना लगेचच लिजंड्स संघात सामील झाला आहे. त्यामुळे अनेक दिग्गजांना खेळताना पाहण्याची संधी क्रिकेट चाहत्यांना मिळणार आहे.