+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule28 Dec 22 person by visibility 196 categoryशैक्षणिकशैक्षणिक

कोल्हापूर
भारतातील शल्य चिकित्सकांची शिखर संघटना असलेल्या ‘असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया’च्या (एएसआय) सचिवपदी कोल्हापूर सर्जिकल सोसायटीचे ऍडव्हाजरी मेंबर व डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कोल्हापूरच्या डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. 32,068 सदस्य असलेल्या या संघटनेच्या ८४ वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्रातून सचिवपदी निवड होणारे ते पहिलेच सर्जन आहेत.

मागील १२ वर्षांमध्ये डॉ. वरुटे यांनी सर्जरीच्या विषयक अनेक परिसंवाद, कार्यशाळा, थेट शस्त्रक्रिया प्रक्षेपण कार्यशाळा, वैद्यकीय शिक्षण परिषद अशा अनेक व्यासपीठावर सहभाग घेतला आहे. महाराष्ट्र शल्यचिकित्सकांची वार्षिक परिषद २०१६, कोविड काळात ऑनलाईन प्लँटफॉर्मवर २० पेक्षा जास्त कार्यशाळा आयोजित केल्या. याचीच पोचपावती म्हणून भारतीय शल्यचिकित्सकांनी डॉ. प्रतापसिंह वरूटे यांची महाराष्ट्रातून या पदी निवड केली. या कार्यकाळात त्यांनी भारतीय शल्यचिकित्सकांसाठी विविध उपयुक्त योजनांचा अवलंब करायचे ठरवले आहे.

डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, सुप्रीटेंडेंट डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, डिपार्टमेंट ऑफ सर्जरीचे विभाग प्रमुख डॉ. शीतल मुरचीटे व त्यांचे सहकारी, तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी अध्यक्ष डॉ. नमिता प्रभू, सचिव डॉ. सौरभ गांधी, खजानीस डॉ. सागर कुरुणकर व सर्व संचालक मंडळ तसेच कोल्हापूर सर्जिकल सोसायटी व महाराष्ट्र सर्जिकल सोसायटीचे सर्व सभासद तसेच डॉ. आप्पासाहेब मेमोरियल हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. वसुंधरा वरूटे व त्यांचे सर्व सहकारी यांनी डॉ. वरुटे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.