Awaj India
Register
Breaking : bolt
राधानगरीत महायुतीला धक्का; किसन चौगुले समविचारी आघाडीतइस्पुर्ली पोलिसांची विशेष कामगिरी; ३.१५ लाखांचे १४ मोबाईल शोधून मालकांना परतदुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवत कौस्तुभ गावडे यांचा साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखलपुणे पदवीधर मतदारसंघासाठी डॉ. स्मितादेवी जाधव यांच्या नावाची चर्चा; शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेत संधी द्यावी.भविष्यात गोकुळ दूध संघाचा कारभार परप्रांतीय अमूलवर अवलंबून राहता कामा नये संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*

जाहिरात

 

राधानगरीत महायुतीला धक्का; किसन चौगुले समविचारी आघाडीत

schedule08 Oct 26 person by visibility 20 categoryराजकीय

आवाज इंडिया 

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यात महायुतीला धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि गोकुळचे माजी संचालक किसन चौगुले यांनी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी चौगुले यांची आघाडीकडून उमेदवारीही जाहीर केली.

राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समविचारी आघाडीला पाठिंबा दिल्याने गोकुळच्या राजकारणात या घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जात नसल्याने तसेच स्वाभिमान जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे किसन चौगुले आणि उमेश भोईटे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “गोकुळची निवडणूक कोणत्याही एका पक्षाची अथवा व्यक्तीची नसून साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. अडचणीच्या काळात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांचा योग्य सन्मान केला जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.”

किसन चौगुले यांची उमेदवारी पहिल्यांदाच जाहीर करण्यात येत असल्याचे सांगत पाटील म्हणाले की, चौगुले यांचा एकमेव अर्ज आल्याने या गटाची एकजूट आणि ताकद स्पष्ट होते. निवडणुकीला अवघे दहा दिवस शिल्लक असून नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी गावागावांत जाऊन दूध उत्पादकांशी संपर्क वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

किसन चौगुले म्हणाले, “राधानगरी तालुक्यात पक्षाकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. आम्ही १४ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले असून आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवलेला नाही. गोकुळचा विकास आणि शेतकऱ्यांचे हित यासाठी सतेज पाटील यांचे मोठे योगदान आहे. गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी आणि साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही समविचारी आघाडीत प्रवेश केला आहे.”

यावेळी उमेश भोईटे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजेंद्र भाटळे, राजेंद्र पाटील सरवडे, विश्वास पाटील, नानासो पाटील, युवराज बर्गे, संतोष पाटील, भिकाजी एकल, विनय पाटील, पापा पाटील, दीपक किल्लेदार, सर्जेराव पाटील, सुरेश चौगुले, विश्वास पाटील तारळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes