+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शन संघटनेच्या वतीने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन adjustसेनापती कापशीतील ५६६ घरकुलांना तातडीने प्रॉपर्टी कार्ड द्या* adjustशक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती* adjustपरदेश शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 12 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत adjustनिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालतीचे आयोजन adjustडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पार्थ पाटीलला* *ब्रिटिश विद्यापीठाकडून 100% शिष्यवृत्ती* adjustरिमझिम गिरे सावन....' ने कार्यक्रमाची उंची वाढवली adjustडी वाय पाटील अभियांत्रिकीचा* *इगलट्रोनिक्स एव्हिएशन सोबत सामजस्य करार adjustडॉ. बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महावि‌द्यालयात विविध शिष्यवृत्ती योजना जाहीर adjustआवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा*
schedule04 Jul 23 person by visibility 313 categoryराजकीय

 
 वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
 कोल्हापूर आवाज इंडिया प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी, कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने राज्यात वाढत्या मुस्लीम-दलित अन्याय अत्याचान्याच्या घटनेचा निषेध मोर्चा काढण्यात आला.

सध्या राज्यात मुस्लीम, दलित समुहाला जाणीवपूर्वक जातीयवादी शक्तीकडून लक्ष केले जात आहे. जातीच्या आणि धर्माच्या नावाने राज्यात दंगली निर्माण करण्याचे षडयंत्र मनुवादी प्रवृत्ती करीत आहे. बिड जिल्ह्यात परळी गावातील मुस्लीम समाजाच्या जरीनखान याचा पोलीस कस्टडी मध्ये मृत्यु झाला आहे. जळगाव अमळनेर येथील पोलीस कस्टडी मध्ये रिमांड काळात मुस्लीम युवकाचा मृत्यु झाला आहे. परळी व जळगांव पोलीसांच्यावर खूण केल्याप्रकरणी ३०२ कलमाने गुन्हा दाखल करावा. टिपू सुलतान, औरंगजेब यांचे फोटो स्टेटस ठेवल्याकारणाने मुस्लीम समाजातील तरुणांवर व त्यांच्या कुटुंबियावर होणारे हल्ले थांबले पाहिजेत. नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथे भिमजयंती साजरी केली कारणाने बौध्द समाजातील अक्षय भालेराव या युवकाचा खूण करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींची संपत्ती जप्त करावी व त्यांचेवर खटला फास्टट्रैक कोर्टात चालवून आरोपीस फासीची शिक्षा झाली पाहिजे. नांदेड हदगांव वाळकी येथे मातंग समाजातील लोकांनी भिमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरुन रात्रीच्या वेळेत लाईट बंद करुन मातंग वस्तीवर सामुहिक हल्ला चढविला. यामध्ये गायकवाड नामक भिमसैनिकाला गंभीर जखमी करुन गावातील मागासवर्गीय समाजातील १५ लोकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन जेल मध्ये टाकण्यात आले. लातूर रेणापूर येथील मातंग समाजातील पतघाले कुटुंबावर जातीयवादी गावगुंडांनी केलेल्या हल्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सातारा येथील कोरेगांव मधील मातंग समाजातील शशिकांत बोतलजी याला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या संबंधित डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच हाफिज सैयद, मनोहर भिडे यांच्यावर राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, स्वातंत्र्यदिन यांच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याबद्दल देशद्रोह्याचे गुन्हे दाखल करण्यात यावेत. या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

वरील सर्व घटनांचा विचार केला असता राज्यात दलित-मुस्लीम यांच्यावर अन्याय अत्याचाऱ्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या सगळ्या घटनांचा आम्ही वंचित बहुजन या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार झाला नाही, तर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोल्हापूर जिल्ह्यात या सर्व प्रश्नांच्या संदर्भाने मुस्लीम व दलित समाजामध्ये जावून त्यांच्यामध्ये जनजागृती करुन प्रचंड जनआंदोलन उभे करु. यामुळे जर कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण झाला तर यास महाराष्ट्रातील शासन प्रशासन जबाबदार राहील याची कृपया नोंद घ्यावी. असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, दयानंद कांबळे, महासचिव महादेव कुंभार, दक्षिणचे महासचिव
शिवाजी कामोर्चा
कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय गुदगे,
महिला जिल्हाध्यक्ष वासंती ताई, जिल्हा महासचिव भाग्यश्रीताई कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष वंदना पवार, उपाध्यक्ष मनीषा कांबळे, हातकणगलेचे अध्यक्ष अश्फाक देसाई, संतोष सुळकडे, सिध्दार्थ उत्तरचे महासचिव सिद्धार्थ कांबळे,
 करवीरचे अध्यक्ष भिमराव गोंधळी, शिरोळचे अध्यक्ष संदिप कांबळे, भुदरगडचे अध्यक्ष कासम शेख, शाहूवाडीचे अध्यक्ष संजय कांबळे, गडहिंग्लजचे अध्यक्ष अर्जुन दुंडगेकर, पन्हाळ्याचे अध्यक्ष दामाजी जाधव, कागलचे अध्यक्ष साताप्पा कांबळे, जिल्हा सहसचिव विश्वास फरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.