कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
schedule05 Aug 26 person by visibility 8 categoryराजकीय
कोल्हापूर, दि. ५ ऑगस्ट: ज्येष्ठ शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी विद्यापीठातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
आज सकाळी कसबा बावडा येथील ‘यशवंत निवास’ येथे जाऊन कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांनी डॉ. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत डॉ. पाटील यांना आदरांजली वाहिली. याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख तसेच जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
यानंतर कुलगुरू डॉ. कामत, प्र-कुलगुरू डॉ. जाधव आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आमदार सतेज पाटील, डॉ. संजय डी. पाटील तसेच पाटील परिवारातील सदस्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.