जागतिक ओझोन दिन
schedule16 Sep 23 person by visibility 205 category
जागतिक ओझोन दिन
16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन दिन' म्हणून जगभरात 1994 पासून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना मॉन्ट्रियल प्रोटोकॉल - ओझोन स्तर आणि हवामान बदल निश्चित करणे अशी आहे.(The theme for World Ozone Day 2023 is Montreal Protocol – Fixing the Ozone Layer and Climate Change). संयुक्त राष्ट्र महासभेने 16 डिसेंबर 1994 पासून आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. ओझोन वायूचे महत्व सर्वसामान्य लोकांना माहित झाले पाहिजे व ओझोन वायूचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती व्हावी हा उद्देश आहे. पृथ्वी भोवती असणारे वायू, बाष्प आणि धूलिकण यांनी बनलेले वातावरण महत्त्वाचे आहे. वातावरणामध्ये विविध वायू आहेत. त्यामध्ये नायट्रोजन (78.08), ऑक्सिजन (20.94), कार्बन डाय-ऑक्साइड (0.03), ओझोन (0.00006), आॅरगॉन (0.93), नियाॅन, (0.0018), हायड्रोजन (0.00005) ,हेलियम (0.0005), व इतर वायूचे हे प्रमाण आहे व हे वायू वातावरणात महत्वाचे आहेत. वातारणाच्या स्थितांबर थरामध्ये ओझोन वायु आढळतो व त्याचे प्रमाण हळू हळू कमी होत आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचे शोषण ओझोन वायूमुळे होते व त्यामुळे आपले रक्षण होते म्हणून मानवासाठी ओझोन वायू वरदान आहे व एक प्रकारचे कवच आहे. वातावरणाच्या स्थितांबरात थरात पृथ्वीपासून 15 ते 48 कि.मी उंचीपर्यत ओझोन वायु आढळतो. वातारणाच्या वरच्या थरातील ऑक्सिजन रेणूचे (O2) विभाजन सूर्यकिरणातील अतिनिल लहरी करतात, त्यातून ऑक्सिजनचे अणू (O) तयार होतात. ऑक्सिजनचे अणू (O) इतर ऑक्सीजन रेणूशी (O2) जुळुन ओझोनचा ( O3) हा रेणू तयार होतो. अतिनिल लहरी शोषून पुन्हा इतर ऑक्सिजन रेणूशी जुळून ओझोन मध्ये रुपांतरीत होतात. नैसर्गिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप वाढला त्यामुळे ओझोनचे ही प्रमाण कमी होत आहे. गेल्या अनेक वर्षात होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. अंटार्टिका खंडावर ओझोन चे होल तयार झाले आहे व त्याचे परिणाम बर्फ वितळणे व तिथे तापमान वाढणे असे दिसत आहेत. क्लोरोफ्लोरो कार्बन(सी एफ सी) हा घटक ओझोनच्या विनाशास कारणीभूत आहेत. फ्रिज, एअरकंडिशनर, प्लास्टिक निर्मिती व उत्पादने व अन्य घटकामुळे या थराचे नुकसान होत आहे. पृथ्वीवरील ओझोन वायूचे प्रमाण कमी झाले तर सूर्यापासून निर्माण झालेल्या अतिनील किरणामुळे कर्करोग, श्वसनांचे व फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजार होऊ शकतात. अतिनिल किरणांमुळे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होईल. ध्रुवा वरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, सागरी भागाचे तापमान वाढेल, सागरी जीव धोक्यात येतील व पर्यावरणावर परिणाम होईल. जागतिक स्तरावर सगळ्या देशानी एकत्र येऊन मानव निर्मित प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे तरच आपण ओझोन चे रक्षण करु. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास करित असताना नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यायला हवी. विकास करित असताना पर्यावरणाच विचार करायला हवा. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करुनच विकास साधला तरच फायदा होईल. भविष्यकालीन पिढ्यासाठी पुरेश्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व सरंक्षण केले पाहिजे तरच शाश्वत विकास साधण्यास मदत ही होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक
कोल्हापूर
मो 9923497593
जागतिक ओझोन दिन
schedule16 Sep 21 person by visibility 443 categoryसामाजिक

डॉ. युवराज मोटे (कोल्हापूर) : 16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन दिन' म्हणून जगभरात 1994 पासून साजरा केला जातो. या वर्षीची संकल्पना (The theme for World Ozone Day 2021 is Montreal Protocol – keeping us, our food and vaccines cool) अशी आहे. (The United Nations General Assembly in 1994, declared 16 September as the International Day of Ozone Layer/ World Ozone Day for the Preservation of Ozone). ओझोन वायूचे महत्व सर्वसामान्य लोकांना माहित झाले पाहिजे व ओझोन वायूचे संवर्धन करण्यासाठी जनजागृती व्हावी हा उद्देश आहे.
पृथ्वी भोवती असणारे वायू, बाष्प आणि धूलिकण यांनी बनलेले वातावरण महत्त्वाचे आहे. वातावरणामध्ये विविध वायू आहेत. त्यामध्ये नायट्रोजन (78.08), ऑक्सिजन (20.94), कार्बन डाय-ऑक्साइड (0.03), ओझोन (0.00006), आॅरगॉन (0.93), नियाॅन, (0.0018), हायड्रोजन (0.00005) ,हेलियम (0.0005), व इतर वायूचे हे प्रमाण आहे व हे वायू वातावरणात महत्वाचे आहेत. वातारणाच्या स्थितांबर थरामध्ये ओझोन वायु आढळतो व त्याचे प्रमाण हळू हळू कमी होत आहे. सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांचे शोषण ओझोन वायूमुळे होते व त्यामुळे आपले रक्षण होते म्हणून मानवासाठी ओझोन वायू वरदान आहे व एक प्रकारचे कवच आहे.
वातावरणाच्या स्थितांबरात थरात पृथ्वीपासून 15 ते 48 कि.मी उंचीपर्यत ओझोन वायु आढळतो. वातारणाच्या वरच्या थरातील ऑक्सिजन रेणूचे (O2) विभाजन सूर्यकिरणातील अतिनिल लहरी करतात, त्यातून ऑक्सिजनचे अणू (O) तयार होतात. ऑक्सिजनचे अणू (O) इतर ऑक्सीजन रेणूशी (O2) जुळुन ओझोनचा ( O3) हा रेणू तयार होतो. अतिनिल लहरी शोषून पुन्हा इतर ऑक्सिजन रेणूशी जुळून ओझोन मध्ये रुपांतरीत होतात. नैसर्गिक पर्यावरणात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप वाढला त्यामुळे ओझोनचे ही प्रमाण कमी होत आहे. गेल्या अनेक वर्षात होणाऱ्या प्रदूषणामुळे ओझोनचे प्रमाण कमी होत आहे. अंटार्टिका खंडावर ओझोन चे होल तयार झाले आहे व त्याचे परिणाम बर्फ वितळणे व तिथे तापमान वाढणे असे दिसत आहेत.
क्लोरोफ्लोरो कार्बन(सी एफ सी) हा घटक ओझोनच्या विनाशास कारणीभूत आहेत. फ्रिज, एअरकंडिशनर, प्लास्टिक निर्मिती व उत्पादने व अन्य घटकामुळे या थराचे नुकसान होत आहे. पृथ्वीवरील ओझोन वायूचे प्रमाण कमी झाले तर सूर्यापासून निर्माण झालेल्या अतिनील किरणामुळे कर्करोग, श्वसनांचे व फुफ्फुसांचे आजार, मोतीबिंदू व डोळ्याचे इतर आजार होऊ शकतात. अतिनिल किरणांमुळे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या वाढीवर व विकासावर परिणाम होईल. जागतिक तापमान वाढ होण्यास मदत होईल. ध्रुवा वरील बर्फ वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल, सागरी भागाचे तापमान वाढेल, सागरी जीव धोक्यात येतील व पर्यावरणावर परिणाम होईल.
जागतिक स्तरावर सगळ्या देशानी एकत्र येऊन मानव निर्मित प्रदुषण कमी करणे गरजेचे आहे तरच आपण ओझोन चे रक्षण करु. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. विकास करित असताना नैसर्गिक पर्यावरणाचा विनाश होणार नाही याची खबरदारी प्रत्येकांनी घ्यायला हवी. विकास करित असताना पर्यावरणाच विचार करायला हवा. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करुनच विकास साधला तरच फायदा होईल. भविष्यकालीन पिढ्यासाठी पुरेश्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन व सरंक्षण केले पाहिजे तरच शाश्वत विकास साधण्यास मदत ही होईल.
