+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule22 Jul 20 person by visibility 1971 categoryक्रीडा
आवाज इंडिया न्यूज,
कोल्हापूर
कुस्तीचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरच्या शाहू खासबाग मैदानात उत्तरेचा मल्ल गोगा विरुद्ध सादिक पंजाबी यांची कुस्ती जाहीर झाली. सादिक मुळचे पाकिस्तांनी असले, तरी कुस्तीतील बारकावे त्यांनी कोल्हापुरात आत्मसात केले. त्यामुळे कुस्ती शौकिनांच्या नजरा सादिक यांच्या डावपेचावर खिळल्या होत्या. धिप्पाड गोगा यांनी एक तासाच्या अथक परिश्रमानंतर सादिक यांना चितपट केले. पण विजयी झालेल्या गोगा यांच्यापेक्षा शौकिनांनी सादिक यांना डोक्यावर घेतले. कोल्हापूरकरांचे मिळालेल्या प्रेम त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच जोपासले. बुधवारी या गुणी मल्लांने पाकिस्तानमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी कोल्हापूरात समजताच संपूर्ण कुस्ती क्षेत्राने हळहळ व्यक्त केली. तर जुन्या जाणत्या मल्लांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
संस्थान काळात सादिक यांचे वडिल निका पंजाबी कोल्हापूर कुस्तीसाठी येत होते. छत्रपत्री राजाराम महाराज यांच्या कारकीर्दीमध्ये येथे त्यांनी अनेक लढती केल्या. कुस्तीला मिळत असलेल्या पाठबळामुळे त्यांनी मुलगा सादिक यांना येथील लाल मातीत धडे गिरवण्यासाठी कोल्हापुरात पाठवले. शाहू विजयी गंगावेश येथून त्यांनी मल्लेविद्येचे डावपेच आत्मसात करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बुधवार पेठ येथील मठ तालमीमध्ये वास्तव केले. कोल्हापुरातील बहुतांशी काळ याच तालमीत त्यांनी आत्मसात केला. अल्पावधीत त्यांनी अथक परिश्रमाच्या जोरावर बळकट शरीरयष्टी निर्माण केली. याचवेळी कोल्हापूरचे पहिले वहिले हिंदकेसरी श्रीपतराव खंचनाळे यशोशिखरावर होते. त्यांच्या बरोबर त्यांनी दोन हात केले. दुसऱ्या कुस्तीत त्यांनी खंचनाळे यांना पराभूत केले. तत्पूर्वी १९६१ मध्ये गोगा यांच्याविरुद्ध खासबाग मैदानात झालेली कुस्ती विशेष गाजली. तब्बल सव्वा तास गोगा यांचे आक्रमण थोपवून धरताना सादिक यांनी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळाले नाही. कुस्तीत सादिक यांचा पराभव झाला, तरी कुस्ती शौकिनांनी मात्र त्यांच्या लढाऊवृत्तीला भरभरुन दाद दिली. प्रेक्षकांचा मिळालेला हा पाठिंबाच कोल्हापूरकरांशी अखेरपर्यंत ऋणानुबंध कायम ठेवण्यास कारणीभूत ठरला. या लढतीनंतर त्यांनी दक्षिण आणि उत्तरेकडील अनेक मल्लांना धूळ चारली. कुस्ती क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्यांनी लाहोर येथील मल्लांना डावपेच शिकवले. प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते अखेरच्या श्वासापर्यंत कुस्ती क्षेत्राशी निगडीत राहिले. बुधवारी त्यांचे निधन झाल्यानंतर कोल्हापुरातील अनेक जुन्या जाणत्या मल्लांनी व प्रेक्षकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळ गायकवाड, दिनानाथसिंह, अशोक पोवार, दिनकरराव पाटील, हिंदुराव मेटील, विलास सावंत यांनी सादिक यांच्या कुस्तीचे वर्णन केले.