+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustगोकुळ’ मार्फत आमदार पी.एन.पाटील साहेब यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना adjustडी. वाय. पाटील ज्यु. कॉलेजचा* *बारावीचा निकाल १०० टक्के* adjust*डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस पॉलिटेक्निकच्या* *१९ विद्यार्थ्यांची बजाज कंपनीमध्ये निवड* adjustडॉ. प्रविण कोडोलीकर यांचा वाढदिवस विधायक उपक्रमांनी साजरा adjustS3 सॉकर अकॅडमी फुटबॉल स्पर्धेत ३५ संघांचा सहभाग* adjust*प्रा. प्रविण माने यांना पीएच. डी.* adjustडी वाय पाटील फार्मसी मध्ये* *‘जी पॅट’ परीक्षेबाबत मार्गदर्शन* adjustछत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे 21 ते 30 मे दरम्यान आयोजन* adjust*डी. वाय पाटील अभियांत्रिकीच्या* *विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ला भेट* adjustश्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.
schedule05 Mar 24 person by visibility 55 categoryराजकीय

कोल्हापूर : कोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी आमदार श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव तर उपाध्यक्षपदी राजन भारत सातपुते यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाचे मुख्य लिपिक व्ही. एम. तोडकर होते.

कोल्हापूर उद्यम सोसायटी ही महाराष्ट्रातील नावाजलेली सहकारी औद्योगिक संस्था आहे. या संस्थेच्या सन २०२३-२४ ते २०२४-२०२५ या सालाकरीता पदाधिकारी निवडी आज झाल्या. यावेळी अध्यक्षपदी आमदार जयश्री जाधव तर उपाध्यक्षपदी राजन सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेचे संचालक चंद्रकात चोरगे, हिंदुराव कामते, दिनेश बुधले, नितीन वाडीकर, संजय अंगडी, अशोक जाधव, भरत जाधव, माणिक सातवेकर, सुधाकर सुतार, संगीता नलवडे आदी उपस्थित होते.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, सभासद, फौंड्री उद्योजकांनी दाखविलेला विश्वास आणि संचालक, कर्मचाऱ्यांचे काम यामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे संस्थेचे काम अधिक चांगले करण्याची जबाबदारी माझी आहे. संस्थेच्या संभापूर औद्योगिक वसाहतमधील विजेचा प्रश्न मी सोडवला आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योग उभारणी आणि शहरात आयटी पार्क डेव्हलपमेंट साठी मी कटिबद्ध आहे.