Awaj India
Register
Breaking : bolt
कोचिंग क्लासेसवरील जाचक अटी कमी करा; सर्वसामान्य संचालकांना दिलासा द्या – बी. एस. पाटीलचुयेच्या सक्षम नारिंगकर याचा अटकेपार झेंडा कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवाल

जाहिरात

 

ऍन्टी करप्शन आणि ह्यूमन राईट्स मध्ये शोभा कोकीतकर यांची इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून निवड

schedule30 Sep 20 person by visibility 303 category

गडहिंग्लज:-(प्रतिनिधी)एन्टी करप्शन फाउंडेशन आणि ह्यूमन राइट्स इंटरनॅशनल मध्ये शोभा कोकीतकर यानी कोल्हापुर जिल्हा स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नॅशनल कोडिनेटर या पदावर घेण्यात आले होते.त्यानंतर त्यांची उत्तम कामगिरी व योग्य निर्णय यामुळे त्याना आता इंटरनॅशनल डायरेक्टर म्हणून पद मिळाले आहे योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर राष्ट्रीय अध्यक्ष नरेंन्द्र अरोरा यानी त्यांची नियुक्ती केली आहे.
२००५ पासून समाजकार्याचे व्रत हाती घेतलेल्या कोकितकर यानी आरोग्य विभाग मध्ये सुरुवातीला व्हालंटरिज म्हणून काम केल,विशेष गटासाठी त्यातून त्यांना ५ तालुक्यासाठी ORW या पोस्टवर नियुक्ती केली गेली त्यावेळी त्यानी या कामाबरोबरच समुपदेशन ,सोशल स्किम, स्टिग्मा केसेस यासाठी उत्कृष्ट असे काम केले, अनाथ मुलाच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांनी सहकार्य केले या त्यांच्या कामाचे स्वरूप बघून त्यांना समुपदेशक पदावर नियुक्त केले गेले. त्या दरम्यान एसआरएचआर चे ट्रेनिग घेऊन एक वेगळ्या गटासाठी काम सुरु केले ते म्हणजे ह्यूमन राइट्स.
प्रत्येक व्यक्तीला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत, भ्रष्टाचार थांबला पाहिजे कायद्याच्या कचोटित राहून समाजासाठी व गरजू असहाय्य लोकांना मदत करण्याचा मानस असल्याचे यावेळी शोभा कोकितकर यांनी स्पष्ट केले.
या सर्व सामाजिक कार्यात त्यांना त्यांचा मुलगा सूरज यांचे पाठबळ मिळाले आहे.या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शिवाय त्या सकल मराठा महासंघ च्या कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष म्हणून ही मराठा समाज्याचे नेतृत्व करत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes