Awaj India
Register
Breaking : bolt
यशवंतराव चव्हाण (के. एम. सी) काॅलेज मध्ये आविष्कार संशोधन प्रकल्प कार्यशाळा संपन्न डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डेटा सायन्स विभागाला आघाडीच्या कंपन्यांची पसंती*सर्किट बेंचने अवसायनातील दूध संस्था केल्या पात्र*पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे कार्य* *सामान्य माणसाला दिलासा देणारे*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले शाहू समाधीचे दर्शन*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते 1850 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन*घटता जन्मदर, वाढते वंध्यत्व आणि बदलती लोकसंख्या रचना यावर विचार होणे आवश्यक सीपीआर खोकीधारकांची पुनर्वसन करण्याची मागणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेचा मार्ग मोकळालवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज

जाहिरात

 

महालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;

schedule02 Jul 26 person by visibility 388 categoryगुन्हे

 अपहार झाल्यास जबाबदारांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
कोल्हापूर | प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील श्री महालक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्या., तळगाव या संस्थेच्या सन २०२० ते २०२५ या कालावधीतील कारभाराचे फेरलेखापरीक्षण (Special Audit) करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.
पुणे येथील सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, संस्थेतील आर्थिक व्यवहारांबाबत सदस्यांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव व इतर संबंधितांनी मनमानी कारभार केल्याचा तसेच मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणात सदस्यांनी केलेल्या विविध तक्रारी, लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच बचाव संघटनेच्या निवेदनांचा विचार करून संस्थेच्या कारभाराचे फेरलेखापरीक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. फेरलेखापरीक्षणात आर्थिक अपहार अथवा अनियमितता आढळल्यास संबंधित चेअरमन, सचिव आणि लेखापरीक्षकांवर गुन्हे दाखल करून अपहाराची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करण्याबाबतही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने फेरलेखापरीक्षणाचे आदेश जारी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे तळगाव परिसरातील दूध उत्पादक व सभासदांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली असून, फेरलेखापरीक्षणाच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes