Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहनगोकुळमध्ये प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना विरोधजय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रमसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी* *‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेलऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा!आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*

जाहिरात

 

कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-

schedule03 Nov 26 person by visibility category

*केंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल- खासदार धनंजय महाडिक, ६० लाख रूपये खर्चुन बनवलेल्या जुना वाशी नाका ते बुवा चौक रस्त्याचे लोकार्पण*

कोल्हापूरच्या जनतेने शहर आणि उपनगराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीला महापालिकेची सत्ता दिली आहे. त्यांचा विश्वास महायुती सार्थ ठरवेल. केंद्रात, राज्यात सत्ता असल्यामुळे कोल्हापूरच्या विकासासाठी येणार्‍या काळात भरघोस निधी उपलब्ध होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ६० लाख रुपयांचा निधी खर्चून बनवलेल्या जुना वाशी नाका ते बुवा चौक रस्त्याच्या लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
कोल्हापुरातील उभा मारुती चौक ते साने गुरुजी वसाहत हा ग्रामीण भाग आणि उपनगराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली होती. पंचवीस वर्षे या रस्त्याला डांबर लागले नव्हते. त्यामुळे स्थानिक रहिवाशी, व्यावसायिक तसेच या मार्गावरून सातत्याने ये-जा करणार्‍या वाहनधारकांमध्ये महापालिकेविषयी प्रचंड असंतोष होता. या रस्त्यासाठी उपमहापौर अक्षय जरग, माजी नगरसेवक उत्तम कोराणे, माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी खासदार धनंजय महाडिक तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ड्रेनेजच्या कामासाठी आमदार क्षीरसागर यांच्याकडून २० लाख, तर जुना वाशी नाका ते बुवा चौक, खंडोबा तालीम इथल्या रस्त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून ६० लाख रुपये देण्यात आले. त्यातून दर्जेदार रस्ता तयार झाला. या रस्त्याचे लोकार्पण खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते आणि भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाड़िक, उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेविका अर्चना कोराणे, पूर्वा राणे, प्रसाद चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण, भाजपा राज्य कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्या उपस्थितीत झाले. खासदार धनंजय महाडिक, नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडून निधी उपलब्ध करुन घेतला. त्यातून प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न केल्याचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी सांगितले. तर खराब रस्त्यामुळे रहिवासी, व्यावसायिक, वाहनध़ारक त्रस्त होते. त्यांना न्याय देण्याची भूमिका बजावल्याचे माजी उपमहापौर विक्रम जरग यांनी सांगितले. विक्रम जरग हे उपमहापौर असताना, २५ वर्षापूर्वी हा रस्ता झाला होता. त्यानंतर योगायोग म्हणजे त्यांचा चिरंजीव उपमहापौर पदावर असतानाच या रस्त्याचे काम झाले. २५ वर्ष महापालिकेवर विरोधकांची सत्ता होती. त्यांना या रस्त्याचा विकास करता आला नाही. तो आपण निधी देऊन केला आहे. आता शहर विकासासाठी आपण भरघोस निधी देणार आहोत. त्यातून शहराचा चेहरा-मोहरा बदलून जाईल, असा विश्‍वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी माजी महापौर बाजीराव चव्हाण, आर. डी. पाटील, वस्ताद पंडितराव पोवार, अभिजीत वणिरे, बबन मोरे, वस्ताद मनोज बालिंगेकर, ऍड. योगेश साळोखे, सचिन पोवार, संग्राम जरग, सुधीर राणे, राहुल इंगवले, विश्‍वास पोवार, ओंकार जोशी, निखिल कोराणे, शीतल शेळके यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes