अध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणी
schedule03 Nov 26 person by visibility 45 categoryराजकीय
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून निर्माण झालेल्या पेचावर महायुतीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अध्यक्ष निवडीसाठी आम्हालाही दोन संचालकांची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा अध्यक्ष निवडण्यासाठी सतेज पाटील यांनी त्यांच्या आघाडीचे दोन संचालक द्यावेत, अशी खोचक मागणी महायुतीच्या नेत्यांनी केली आहे.
गोकुळच्या २५ संचालकांपैकी १३ संचालक सतेज पाटील समर्थक आघाडीचे, तर १२ संचालक महायुतीचे निवडून आले आहेत. गणपूर्तीसाठी १४ संचालकांची आवश्यकता असल्याने निर्माण झालेल्या पेचाला सतेज पाटील यांची राजकीय सोय जबाबदार असल्याचा आरोप महायुतीने केला आहे.