Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापूर वनविभागात फिंगर जॉईंट मशीनचालक पदासाठी भरती* जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड भावी शिक्षकांची 44 लाखांची फसवणूककोल्हापुरात 'पंचशील वधू-वर सूचक केंद्र'ची सुरुवात; विवाह इच्छुकांसाठी विश्वासार्ह व्यासपीठमहालक्ष्मी सहकारी दूध संस्थेच्या फेरलेखापरीक्षणाचे आदेश;कोल्हापुरात बिल्डरकडे १ कोटींची खंडणी मागून अपहरण; ५ जणांवर गुन्हा दाखलडॉ. संजय डी. पाटील यांना* *डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार प्रदान*भाजपचे किती ठरावधारक आहेत : बाबासाहेब पाटील यांचा आक्रमक सवालशिक्षक नेते एस. व्ही. पाटील सरांचा सेवापूर्ती सदिच्छा व गाडी प्रदान सोहळा कोल्हापुरात रंगणार;१२ वी PCB नंतरच्या करिअर संधीबाबत* *रविवारी कदमवाडी येथे मार्गदर्शन सेमिनार*

जाहिरात

 

जिल्हा परिषद लिपिक कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजितबाबू मगदूम यांची निवड

schedule03 Jul 26 person by visibility 104 categoryराजकीय

कार्यकारिणीची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची मागणी
 
कोल्हापूर, आवाज इंडिया प्रतिनिधी :
 
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी अजित बाबू मगदूम यांची निवड करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या सोडवणुकीसाठी तत्पर असणारे मगदूम यांच्या निवडीने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
 यावेळी नूतन कार्यकारिणीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रशासकीय व जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली आहे. संघटनेने यासंदर्भात निवेदनही सादर केले. 
संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मूलभूत व प्रशासकीय समस्या सोडविण्यासाठी संघटना गेली अनेक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. नुकतीच संघटनेच्या शाखा-कोल्हापूरची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली असून, नव्या पदाधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करायची आहे. यासाठी लवकरात लवकर वेळ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. 
संघटनेच्या वतीने सचिव श्री. प्रविण पाटील व अध्यक्ष श्री. अजितबाबू मगदूम यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : श्री. अजितबाबू कृष्णात मगदूम (मुख्यालय)
उपाध्यक्ष : श्री. सागर चव्हाण (पंचायत समिती, पन्हाळा)
उपाध्यक्ष : श्री. युनूस देसाई (पंचायत समिती, हातकणंगले)
उपाध्यक्ष : श्री. विनायक सुतार (पंचायत समिती, राधानगरी)
उपाध्यक्ष : श्री. अजित कांबळे (पंचायत समिती, गडहिंग्लज)
सचिव : श्री. प्रविण पाटील (पंचायत समिती, गडहिंग्लज)
सहसचिव : श्रीमती सुनीता नागणे (पंचायत समिती, करवीर)
कार्याध्यक्ष : श्री. अभिजीत दराडेकर (पंचायत समिती, करवीर)
खजिनीस : श्री. सुनील कोरवी (मुख्यालय)
महिला प्रतिनिधी : श्रीमती पूजा पाटणकर (मुख्यालय)
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes