Awaj India
Register
Breaking : bolt
डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातापदी डॉ. राजेश ख्यालप्पास्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!

जाहिरात

 

विकास विद्या मंदिर सरनोबतवाडीत साकारत आहे डिजिटल क्लासरूम

schedule07 Dec 24 person by visibility 731 categoryशैक्षणिक

कोल्हापूर
सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील विकास विद्यामंदिर येथे डिजिटल क्लासरूम साकारत आहे. एकीकडे सरकारी शाळेबद्दल उदासीनता दिसत असली तरी या शाळेने मात्र जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामपंचायत निधीतून व लोकसहभागातून पूर्ण शाळा स्मार्ट टू ग्लोबल करण्याचा आराखडा आखण्यात आला आहे.
विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी शाळेचे सन्माननीय
अध्यापक श्री.काशिराम विठ्ठल बिरूणगी यांच्या प्रयत्नातून व लोकसहभागातून विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी शाळेत इ. 1ली च्या वर्गात साकारत आहे
      या डिजीटल क्लासरूम साठी स्मार्ट टू ग्लोबल स्कूल यादववाडी शाळेचे संकल्पक व त्या शाळेचे माजी अध्यापक व विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी शाळेचे सध्याचे कार्यरत अध्यापक श्री. रविंद्र मनोहर केदार यांची प्रेरणा मिळाली.
या डिजीटल क्लासरूम साठी विशेष सहकार्य मिळाले ते विकास विद्यामंदिर सरनोबतवाडी शाळेचे इ.6 वी चे  व इ.1 ली चे देणगीदार पालक,शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.अंबादास साहेबराव बडे, सरनोबतवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय सौ. शुभांगी किरण आडसूळ,उपसरपंच प्रमोद शिवाजी कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष अंगद गजबर, उपाध्यक्ष सो प्राजक्ता मुकुंद कांबळे यांच्यासह इतर  देणगीदारांच्याकडून एक लाख तीस हजार चे इंटर ऍक्टिव्ह पॅनल बसवणे चे नियोजन आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes