+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule14 Feb 24 person by visibility 105 categoryराजकीय
*कोल्हापुरातील ई बसेस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकारकडून १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर*

कोल्हापूर ; आवाज इंडिया

कोल्हापुरात लवकरच शंभर इलेक्ट्रिक बसेस धावताना दिसणार आहेत. पंतप्रधान ई बस सेवा योजनेतून कोल्हापूरसाठी शंभर इलेक्ट्रिक बसेस मंजूर झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली होती. आता या बसेस लवकरात लवकर कोल्हापुरात सुरू व्हाव्यात, यासाठी खासदार महाडिक पाठपुरावा करत आहेत. याबाबत दिल्लीमध्ये नुकतीच उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये ई-बसेस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी, सुमारे १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
पंतप्रधान ई बस सेवा योजनेतून कोल्हापूरला तब्बल १०० इलेक्ट्रिकल बसेस मंजूर झाल्या आहेत. या ई बसेस मंजूर होण्यासाठी आणि लवकरात लवकर कोल्हापुरातील रस्त्यावर या बस धावाव्यात, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांचा सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे. नुकतीच नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यातून कोल्हापूरच्या ई-बसेस प्रकल्पाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी, सुमारे १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय. या निधीतून ई बसेस चालवण्यासाठी आवश्यक मूलभूत तांत्रिक सुविधांची पूर्तता केली जाणार आहे. केंद्र शासनाकडून मिळालेल्या १७ कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीमधून विविध कामे होणार आहेत. त्यामध्ये एमएसईडीसीएल यांच्या एचटी लाइनसाठी १० कोटी ३५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यातून गोकुळ शिरगाव ते शास्त्रीनगरमधील केएमटी वर्कशॉप या मार्गावर दहा किलोमीटर लांबीची भूमिगत ३३ किलोमिटरची विद्युत केबल लाईन येणार आहे. तसेच महावितरणच्या सबस्टेशन मधून स्वतंत्र फिडर कार्यान्वित होणार आहे. त्याचप्रमाणं महावितरण साठी सुरक्षा ठेव म्हणून ३ कोटी ५४ लाख रुपये मंजूर झाले आहेत. तर के. एम. टी. च्या वर्कशॉपमध्ये, कमी दाबाची विद्युत वाहिनी तसंच ट्रान्सफार्मर आणि अन्य अंतर्गत कामासाठी ४ कोटी ६ लाख रुपये मंजूर झाले आहेत. कोल्हापूर साठी मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसेससाठी मूलभूत तांत्रिक कामांच्या पूर्ततेकरता एकूण १७ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजुर झाल्याने, लवकरच कोल्हापुरात ई बसेस धावू लागतील, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलाय.