Awaj India
Register
Breaking : bolt
संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्धशिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाजवळ लवकरच 'गोकुळ शॉप' होणार सुरू;

schedule17 Aug 26 person by visibility 439 categoryउद्योग

 जिल्हा परिषद सदस्य राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या मागणीला यश

​कोल्हापूर:

कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात नागरिकांची होणारी मोठी वर्दळ लक्षात घेता तेथे दुग्धपदार्थांची 'गोकुळ शॉप' सुरू करण्यात यावी, या जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. राजूभाऊ सूर्यवंशी (पाडोळी खुर्द) यांच्या मागणीला गोकुळ दूध संघाने (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि.) सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

​राजूभाऊ सूर्यवंशी यांनी ७ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भात गोकुळ दूध संघाकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्या पत्राची दखल घेत गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक यांनी १४ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत पत्र पाठवून जिल्हा परिषद परिसर क्षेत्रात एक्सक्लुझिव्ह (Exclusive) गोकुळ शॉप उभारणीसाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

  • ​गरज व प्राधान्य: जिल्हा परिषद कार्यालयातील लोकांची दररोजची गर्दी व वर्दळ पाहता येथे गोकुळचे दुग्धपदार्थ केंद्र असणे गरजेचे आहे. गोकुळला प्रथम प्राधान्य दिल्याबद्दल दूध संघाने श्री. सूर्यवंशी यांचे आभार मानले आहेत.
  • ​जागा निश्चिती: गोकुळ शॉपसाठी योग्य जागेची निश्चिती करून कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • ​पुढील प्रक्रिया: जागेची पाहणी व सर्व्हे गोकुळच्या कर्मचाऱ्यांमार्फत केला जाईल. तसेच, शॉप उभारणीसाठी लागणारे नियम, अटी व आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली जाईल.

​जिल्हा परिषद कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांची सोय व्हावी या उद्देशाने राजूभाऊ सूर्यवंशी यांनी हा पुढाकार घेतला होता. आता प्रत्यक्ष जागेचा सर्व्हे होऊन लवकरच हे 'गोकुळ शॉप' नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes